shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएलच्या उर्वरीत सत्रासाठी उपलब्ध असणारे परदेशी खेळाडू



                  भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावामुळे आठवडाभर स्थगिती दिल्यानंतर शनिवारपासून आयपीएलचा पुन्हा एकदा बिगुल आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे विद्यमान सत्रात ज्या दोन संघातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ झाला त्याच केकेआर आणे आरसीबी या दोन संघातील लढतीने स्थगित पर्वाला सुरुवात होईल. फरक इतकाच असेल पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर झाला तर हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होतोय. सदर स्पर्धेचा हंगाम तोच आहे, पण अनेक संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. आयपीएलमधील सर्व दहा संघांमधील बहुतेक परदेशी खेळाडू पुन्हा संघात सामील होणार नाहीत. यामध्ये अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघातून खेळावे लागते, तर काही खेळाडू दुखापतीमुळे संघात सामील होऊ शकत नाहीत.


                 स्पर्धा स्थगित झाली तेंव्हा गुजरात टायटन्स गुणतालिकेत आघाडीवर होता. त्यामुळे गुजरात टायटन्स प्लेऑफच्या अगदी जवळ आहे आणि प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. जर ते दोन सामने जिंकण्यात यशस्वी झाले, तर गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात. यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.

                गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आरसीबी असून ते देखील अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे आणि त्यांचे अजूनही तीन सामने शिल्लक आहेत. जर आरसीबीने तीनपैकी एक जरी सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करतील. तिन्ही सामने जिंकले तर आरसीबी  पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवू शकतो. तिसऱ्या कमांकावर पंजाब किंग्ज तर चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. या दोन्ही संघांना आपले उर्वरीत सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे.

भारत पाक तणावामुळे जवळ जवळ सर्वच संघाचे काही आपापल्या देशांच्या राष्ट्रीय सेवेसाठी गेले असल्याने प्रत्येक संघाचे बलाबल कमी अधिक झाले असून स्पर्धेतील उर्वरीत सामन्यात रंगत वाढविण्यासाठी प्रत्येक संघाला तारेवरची कसरत करावी लागली आहे. सदर लेख प्रपंचात सर्व संघात उपलब्ध असलेल्या परदेशी खेळाडूंची माहिती देत आहोत.

परदेशी उपलब्ध असलेला पहिला संघ आहे गुजरात व त्यामधील खेळाडू असे- जोस बटलर (लीग टप्प्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - कुसल मेंडिस (कुसल मेंडिस प्लेऑफसाठी उपलब्ध असेल) - कागिसो रबाडा (लीग टप्प्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - शेरफेन रदरफोर्ड, राशीद खान, करीम जन्नत, दासुन शनाका, गेराल्ड कोएत्झी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी उपलब्ध परदेशी खेळाडू - जेकब बेथेल (फक्त दोन लीग-स्टेज सामन्यांसाठी उपलब्ध) - लुंगी एनगिडी (लीग स्टेज संपेपर्यंत उपलब्ध) - रोमारियो शेफर्ड, फिल साल्ट, टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन, नुवान तुषारा

पंजाब किंग्ज साठी उपलब्ध खेळाडू - मार्को जॅन्सन (लीग टप्प्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - काइल जेमिसन (दुखापत लॉकी फर्ग्युसनचा तात्पुरता बदली खेळाडू) - मिचेल ओवेन, अझमतुल्लाह ओमरझाई, झेवियर बार्टलेट

उपलब्ध नसलेले नियमीत खेळाडू - जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, आरोन हार्डी

मुंबई इंडियन्ससाठी उपलब्ध खेळाडू - विल जॅक्स (लीग स्टेजच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - जॉनी बेअरस्टो (प्लेऑफसाठी बदली खेळाडू) - रायन रिकेल्टन (लीग स्टेजच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - रिचर्ड ग्लीसन (प्लेऑफसाठी बदली खेळाडू) - कॉर्बिन बॉश (लीग स्टेजच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - बेवन जेकब्स, मिशेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, रीस टॅपली, मुजीब उर रहमान

दिल्ली कॅपिटल्ससाठी उपलब्ध खेळाडू - ट्रिस्टन स्टब्स (लीग टप्प्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध) - फाफ डू प्लेसिस, दुष्मंथा चामीरा, सेदिकुल्लाह अटल, (मुस्तफिजुर रहमान १८ ते २४ मे दरम्यान उपलब्ध असेल)

उपलब्ध न होऊ शकणारे नियमित खेळाडू - मिचेल स्टार्क, जेक फ्रेझर-मॅकगर्क, डोनोव्हन फरेरा.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी उपलब्ध खेळाडू - सुनिलल नारायण, आंद्रे रसेल, क्विंटन डी कॉक, स्पेन्सर जॉन्सन, रहमानउल्लाह गुरबाज, एन्रीकक नॉर्किया

उपलब्ध होऊ न शकणारे खेळाडू  - मोईन अली व रोवमन पॉवेल

लखनौ सुपर जायंट्ससाठी उपलब्ध खेळाडू - एडन मार्करम (लीग टप्प्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध), - विल ओ'रोर्क (जखमी झालेल्या मयंक यादवची जागा घेणारा) - मिचेल मार्श, निकोलस पूरन, डेव्हिड मिलर, मॅथ्यू ब्रीट्झके

उपलब्ध न होऊ शकणारा खेळाडू - शमर जोसेफ

सनरायझर्स हैदराबादसाठी उपलब्ध खेळाडू असे आहेत - पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, कामिंदू मेंडिस, इशान मलिंगा

उपलब्ध न होऊ शकणारा एकमेव खेळाडू - विआन मुल्डर

राजस्थान रॉयल्ससाठी उपलब्ध खेळाडू- शिमरॉन हेटमायर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, फझल हक फारुकी, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, महेश तिक्षणा.

उपलब्ध नसणारे नियमित खेळाडू - जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर

चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध असलेले खेळाडू- नूर अहमद, मथिशा पाथिराना, डेव्हाल्ड ब्रुविस, डेव्हॉन कॉनवे.


संघात न होऊ शकणारे नियमित खेळाडू  - जेमी ओव्हरटन, सॅम करन, रचिन रविंद्र, नॅथन एलिस.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close