हिरोजी इटळकर हे नाव असताना प्रस्थापित काही विद्वान पंडित लोक स्वतःला शहाणे, स्वतःचे जात वर्चस्व टिकवावे, नातेगुते वंशावळ तयार करून पुस्तके फिल्म यु ट्यूब इत्यादी माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. खरा इतिहास पुसले जावे म्हणून इतिहासकाराने हिरोजी इंदलकर (देशमुख) हे नावाने उदो उदो करून घेतला आहे. तेच पुढे प्रचलित केला जात आहे. त्यामुळे गुगल सर्च केल्यास हिरोजी इंदलकर नाव दिसेल.
परंतु हिरोजी इंदलकर नसून हिरोजी इटळकर हेच खरे आहे.
पनवेल येथील रहिवासी असलेला वार्ताहर इतिहासकार, संशोधक जाणकार तेली समाजाचे श्री. सुधाकर लाड ( ९२२४२३२९६३) पुणे सत्र न्यायालयात तब्बल ९ वर्षे न्यायलयीन लढा देत राहिला. घरची आर्थिक परिस्थिती नीट नसताना बायकोचे मंगळसूत्र विकून वकील खर्च केला आहे. सर्व पुरावे सह न्यायालयात सादर केले. त्यात न्यायलयीन साक्षीदार आपल्या समाजाचे वडार समाज आणि संस्कृती या पुस्तकाचे लेखक श्री. सतिश पवार (९८५०९०९२४२) कोल्हापूर, हे आता पुण्यात आहेत आहेत तेव्हाच पुणे सत्र न्यायालयात न्यायाधीश साहेबानी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. तेव्हा हिरोजी इटळकर हे नाव शिक्कमोर्तब झाले आहे.
इतिहासकार विद्वान पंडित यांना न्यायालयात माफी मागण्यास भाग पाडले व त्यांनी मान्य केले.
आपले दुर्दैव असे आहे की वडार समाजाचा नेता अगर कार्यकर्ता यांनी कोणीच दखल घेतली नाही. साधे विचारणा सुद्धा करण्यात आली नाही. आमचे अखिल भारतीय वडार बोली भाषा साहित्य संमेलन -२०२२ पुणे मध्ये साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
श्री. सुधाकर लाड याने "छत्रपतींचे सुभेदार इमारती वडार समाजाचे हिरोजी इटळकर " हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्या पुस्तकात वाचायला मिळते त्यात गैझेट, पेपर्स कटिंग, छायाचित्रे इत्यादीचा समावेश आहे.
थोडक्यात इटळकर हे वडार समाजाचा आडनाव व गोत्र फिटलोर आहे. बांधकाम साठी लागणारे दगड सामग्री पायथ्यापासून गडावर नेत असताना सामूदायिक दोऱ्या साखळीने नेत असताना राय हे आवाज देत असतात राय ( दगड) म्हणतात म्हणून वडार समाजाचा प्रती खुद्द शिवाजी महाराजांनी किल्लेला रायगड हे नाव दिले आहे. हे पुरावा पुरेसे नाही का..?
हिरोजी इटळकर हे शिवाजी महाराजांचे बांधकाम (स्थापत्य) प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी बांधकाम अत्यंत मजबूत आणि वास्तूनिष्ट असे बांधले आहे. आताचे कोणत्याही सिव्हिल अभियंत्याला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इटळकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून खुद शिवरायांनी तळे विहिरी, मंदिरे, कमानी, मनोरे, मंडप, तोरणे, शौचालय, वापीकृप, तडांग, प्रासाद, उद्याने, राजपथ, स्तंभ, गजशाला, बैठक हॉल, नरेंद्र सदन बारा महाल अनेक कामे करून घेतले होते. ही कामे करताना महाराजांचे अनुपस्थितीत आर्थिक तरतूद कमी पडले असताना स्वतःचे घर व जमीन विकून वरील बांधकामास खर्च केले होते. सर्व पाहिल्यावर शिवाजी महाराज खूश होऊन महाराजांनी हिरोजी इटळकर यांना विचारले असता. आज जे मागाल ते तुम्हाला खुषीत देवू यावर हिरोजी काही न बोलता उभे राहिले. महाराज म्हणाले बोला हिरोजी. त्यावेळी हिरोजी म्हणाले की, काय बी नको फक्त राजांनी अनुमती देण्यात यावी की या गडावरील जगदीश्वर मंदीराचे एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. आणि राजाने अनुमती दिली आहे. म्हणून आपले नाव कोरले त्यात लिहिले कि हिरोजी इटळकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेत असेल आणि आपल्या शिलालेखात त्यांनी सेवेपायी तत्पर हिरोजी इटलकर असे आहे. अजून इतिहासात साक्ष देत आहे. ते निष्ठावान होतें
शेकडो वर्षांपूर्वी शिवरायांच्या आदेशाने स्वराज्याप्रति निष्ठा ठेऊन हिरोजी इटळकरांनी उभारलेले किल्ले अजूनही मजबूत अवस्थेत आहेत. आम्ही आमचा इतिहास विसरत आहोत. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
हा तमाम शिवप्रेमीं महाराष्ट्राचा व महाराजांचा अवमान आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन इंदुलकर हे नाव वापरणेस मनाई करावी. असे समस्त वडार बांधवाची मागणी करण्यात यावे, ही विनंती.
🙏🙏🙏🙏