सहभागी होण्याचे आवाहन
शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा -
यवतमाळ:-भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध सतत कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांचा पोषणकर्ता पाकिस्ताना यांना धडा शिकविणारे ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलांनी राबविले. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देणारी ही भारतीय सेनेची ऐतिहासिक कामगिरी आहे.
भारतीय सेनेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व सन्मानार्थ यवतमाळ शहरामध्ये 'सिंदुर सन्मान तिरंगा यात्रा' दि. 18 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता भावे मंगल कार्यालय पासून इंदिरा गांधी मार्केट -पाच कंदील चौक -तहसील चौक -जाजू चौक -दत्त चौक -नेताजी चौक -महादेव मंदिर रोड ते आझाद मैदानातील जयस्तंभ पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे.
भारतमातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेनादलांतील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येणार आहे. या यात्रेत माजी सैनिकांचा व शहीद कुटुंबीयांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. यवतमाळ शहरातील देशभक्त नागरिकांनी अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती आपला अभिमान व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेत उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन देशभक्त यवतमाळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.