shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा


              राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोरडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ शरद जोगी व जिल्हा हत्तीरोग अधिकारी दिनेश भगत यांचे मार्गदर्शनाखाली मोर्शी शहरातील पावडे नर्सिंग होम तसेच आदिवासी वस्तीगृह येथे राष्ट्रीय डेंगू दिन साजरा करण्यात आला. 

             कार्यक्रमांमध्ये डेंगू आजाराबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली यावर्षीचे डेंगू दिनाचे घोषवाक्य "तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा, डेंगूला हरविण्याचे उपाय करा" या घोषवाक्यानुसार १)आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडा २)गप्पी मासे पाडा डेंगू हिवताप हत्तीरोग टाळा इत्यादी प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या तसेच पावसाळ्यात डेंगू आजाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली.

                 यावेळी आरोग्य कर्मचारी विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, नंदू थोरात व इतर कर्मचारी हजर होते तसेच पावडे नर्सिंग कॉलेजचे शिक्षक इंगळे मॅडम, तायडे मॅडम तसेच कर्मचारी श्री नेवारे हजर होते.
close