वडाळा महादेव [ प्रतिनिधी ] श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील जागृत देवस्थान दावल मलिक बाबा व वीरभद्र महाराज यात्रा उत्सव निमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक ३ गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता संदल मिरवणूक तसेच शुक्रवार दिनांक ४ रोजी संध्याकाळी सात ते नऊ दरम्यान छबिना मिरवणूक तसेच लोककलावंत मा नितेश कुमार अहिरेकर तसेच रूपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा संपन्न होणार आहे तसेच शनिवार दिनांक पाच रोजी सकाळी साडेआठ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार असून दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये भव्य बैलगाडा शर्यत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा तसेच विवीध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन निपाणी वडगाव ग्रामस्थ तसेच दावल मलिक बाबा वीरभद्र महाराज यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे