श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेची (स्पुक्टो) जिल्हा कार्यकारिणीची सभा नुकतीच राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगर येथे संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या वार्षिक अहवाल त्याचबरोबर संघटनेच्या कामकाजाचा आढावा यावर सविस्तर चर्चा झाली.
याच सभेत संघटनेची पुढील दोन वर्ष २०२५ व २०२६ साठी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. बाबासाहेब पवार - अध्यक्ष- बेलापूर महाविद्यालय (ता. श्रीरामपूर), सरचिटणीस - डॉ. रघुनाथ नजन -पारनेर महाविद्यालय, उपाध्यक्ष - डॉ. रमेश नवल - जिजामाता महाविद्यालय भेंडा, उपाध्यक्ष - डॉ. राजेंद्र वामन - संगमनेर नगरपालिका महाविद्यालय, सहसचिव - डॉ. अविनाश फलके जामखेड महाविद्यालय, सहसचिव- डॉ. भागवत परकाळ - अहमदनगर महाविद्यालय, खजिनदार - डॉ. प्रतिक नागवडे - आनंद महाविद्यालय पाथर्डी, अंतर्गत हिशेबतपासणीस- डॉ. मनोहर सूर्यवंशी- श्री छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा, स्पुक्टो प्रतिनिधी डॉ. सतीश सायकर राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगर यांची अनुक्रमे निवड झाली. या प्रसंगी डॉ. के.एल. गिरमकर अध्यक्ष स्पुक्टो तसेच डॉ. व्ही. एम. शिंदे सरचिटणीस स्पुक्टो हे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉ. एस. पी. लवांडे- अध्यक्ष- महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ व प्रा. मगन ताटे -अध्यक्ष निवृत्त -प्राध्यापक संघटना यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. बदलत्या काळातील उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील वाढती आव्हाने, वाढत्या खाजगीकरणाचा उच्च शिक्षणावर होणारा परिणाम यासह व्यापक विद्यार्थी व समाज हितासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने व एकजुटीने काम करावे अशी अपेक्षा डॉ. एस. पी. लवांडे यांनी व्यक्त केली. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज, प्रा. प्रदीप मुटकुळे, प्रा. संदीप पालवे, डॉ. भाऊसाहेब पवार, डॉ. बाबासाहेब गव्हाणे आदी स्पुक्टोचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111