shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जप्त केलेल्या अवैध वाळु साठ्याची चौकशी करुन दोषीवर कारवाई करा:-पंडीतराव तिडके

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 


 हिंगोली जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने अवैधरीत्या जप्त केलेल्या वाळुसाठ्याची सखोल चौकशी करून दोषी गैरजिमेदार लोकसेवक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके यांनी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



अवैधरीत्या जप्त केलेल्या वाळुसाठ्याची विल्हेवाट कशी करण्यात आली,जप्त केलेला वाळुसाठा विक्री कधी करण्यात आला,जप्त केलेल्या वाळुसाठ्या मधून शासन दरबारी महसूल किती जमा करण्यात आला तसेच जप्त केलेल्या वाळुसाठ्याचा बोजा सातबारावर नोंदविण्यात आला होता की नाही संबंधित महसूल अधिकारी यांनी पुढील काय कारवाई केली या सर्व बाबींची प्रत्यक्ष दप्तर तपासणी व सखोल चौकशी करून दोषी आढळून आल्यास संबधीत दोषी गैरजिम्मेदार लोकसेवक अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,जप्त केलेला वाळूसाठा आज रोजी हयात असल्याचे दिसत नसल्याने अवैधरीत्या जप्त केलेल्या वाळु साठ्याचे प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई करण्यात यावी,!जप्त केलेला वाळूसाठा महसूल दरबारी जमा केला असलेल्या रेकॉर्डची तपासणी व सखोल चौकशी करण्यात यावी.जप्त केलेला वाळूसाठ्याची विल्हेवाट केली असल्यास विक्री कशी करण्यात आली,कोणते वाहन वापरण्यात आले विक्री केली असल्यास शासन दरबारी किती महसूल जमा करण्यात आला याची सखोल तपासणी  करण्यात यावी,जप्त केलेला वाळूसाठा विल्हेवाट व विक्री केला असल्यास एकूण महसूल शासन दरबारी किती व कधी जमा करण्यात आला व सदर प्रक्रियातील सर्व कागदपत्राची सखोल तपासणी व चौकशी  करण्यात यावी,अवैधरीत्या जप्त करण्यात आलेला वाळुसाठा यांची विल्हेवाट करण्यासाठी केलेली कारवाई व शासन दरबारी जमा केलेला महसूल सह कागदपत्राची सखोल दप्तर तपासणी व चौकशी करून दोषी व गैरे जिम्मेदार लोकसेवक अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व केलेल्या सखोल चौकशी व दप्तर तपासणी कारवाईचा अहवाल शिग्र पोस्टद्वारे देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

close