shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१७ वर्ष देशाची सेवा करून परतणाऱ्या जवानाचे गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 


भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्न असतात पण हे स्वप्न प्रत्येकाचे पुर्ण होत नाही सैनिक सिमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील हिवरखेडा येथील सिताराम तुळशीराम फुपाटे १७ वर्ष १ महिना १२ दिवस देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतले आहेत.त्याच्या सेवापुर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.२ एप्रिल बुधवार रोजी गावातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.



 सेनगांव तालुक्यातील हिवरखेडा येथील सिताराम तुळशीराम फुपाटे यांनी सतरा वर्षे सीमेवर देश सेवा करुन सेवानिवृत्त झाल्याने त्यांची ढोल ताशाच्या गजरात गावात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.संपूर्ण गाव व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तयार होते.दोन दिवसांपुर्वी सिताराम फुपाटे हे सैन्य दलातून निवृत्त झाले निवृत्तीनंतर अनोखी भेट म्हणून गावातील गंगाराम खुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गावभरात स्वागताचे बॅनर लावले होते‌ तसेच घरोघरी रांगोळी काढण्यात आली व हिवरखेडा जि. प.प्राथमिक शाळेत सेवापुर्ती सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आला.देशसेवा करून गावी पोहोचल्यावर संपूर्ण गाव भावुक झालं होत जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रोशीतील व त्यांच्या सर्व नातेवाईकांनी देखील हजेरी लावली होती.

यावेळी संपुर्ण गाव सजून धजून उभं होतं सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबियांना जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते जवानाचा गावात प्रवेश होताच फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले व कुटुंबाच्या वतीने गोड भरून त्यांचे औक्षण  करण्यात आले.सतरा वर्ष एक महिना बारा दिवस देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सेवानिवृतीच्या निमित्ताने फुपाटे यांच्या कुटुंबीयांकडून गावातील सर्व ग्रामस्थांना गाव जेवण देखील देण्यात आले.त्यांच्या या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला माजी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे,रा.काँ.सेनगांव तालुकाध्यक्ष रविंद्र गडदे, शिक्षणाधिकारी दत्ता नांदे, कैलास निरगुड,माजी सैनिक विष्णू खेलबाडे,सौ.पूजा अमोल मस्के,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भगवान निरगुडे,वामन हराळ,मुख्याध्यापक दीपक मोरे व शाळेतील शिक्षक वृंद पत्रकार शिवशंकर निरगुडे,शरद निरगूडे शिवाजी गायकवाड,प्रदीप हराळ   कडूजी इंगळे,विलास हराळ  राजेश देसाई,दत्ता देसाई,स्वप्निल हराळ,गोलु हराळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close