भारतीय सिनेसृष्टीचे जनक भारतरत्न स्व. दादासाहेब फाळके यांच्या १५५ व्या जयंती निमित्त क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांना परिवार काफ अवॉर्ड २०२५ हा प्राप्त झाला आहे.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान व क्रिकेटच्या अंपायरींग, कोचिंग व समिक्षा क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणारे डॉ. दत्ता विघावे हे फिल्मसिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव पूर्व, मुंबई यांच्या कठीण परीक्षेत सफल झाले. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते ३० एप्रिल २०२५ झालेल्या कार्यकमास डॉ. दत्ता विघावे उपस्थित राहू न शकल्याने त्यांना संबंधितांनी टपालाद्वारे पुरस्कार घरपोहोच केला.
डॉ. दत्ता विघावे यांचे कार्य क्रिकेट शिवाय सामाजिक, पर्यावरण, शिक्षण, साहित्य, आरोग्य या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासह ग्लोबल पीस, ग्लोबल फ्रेंडशीप, डॉक्टरेट, मानद डि.लिट व अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून ऑस्ट्रेलिया, रशिया यांच्या अंतराळातून प्रकाशित होणाऱ्या स्पेस मॅगझिनमध्ये डॉ. दत्ता विघावे यांच्या कार्याची नोंद झाली आहे. शिवाय अमेरिकेच्या नासाकडून ४ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या विशेष चांद्र मोहिमेसाठी निमंत्रित केले आहे.
डॉ. विघावे यांच्या अष्टपैलू कार्याची पावती भारतीय सिनेसृष्टीचे जनक भारतरत्न स्व. दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या परिवार काफ अवॉर्ड २०२५ च्या रुपाने मिळाली आहे.
मा. डॉ.सुधीर तारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रफुल्ल आगवने, काफ अवार्ड सचिव शशि दीप, काफ अवार्ड उप सचिव ॲड. खालिद सर, राम भट्टर व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. सदर कार्यक्रमास दादासाहेब फाळके यांचे नातू डॉ. चंद्रशखेर पुसळकर, सुन व नात तसेच बॉलिवुडचे अनेक अभिनेते व अभिनेत्री सदर कार्यक्रमास उपस्थित होते.