shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ई.१०वी दहावीचे माजी विद्यार्थी १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेत

श्रीराम हायस्कूलचे माजी विद्यार्थी १८ वर्षांनी पुन्हाएकदा शाळेत....!

नगर प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील दहिगाव येथे जिल्हा मराठा समाजाचे श्री राम हायस्कूल आहे. दहिगाव साकत खुर्द येथील इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी सन २००६ -२००७ माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजन केले होते. ईतर वेळी शाळा रविवारी भरत नाही.पण परंतु माजी विद्यार्थी आपला आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा शाळेचे बेल वाजवुन नेहमी प्रमाणे आपल्या उंची प्रमाणे रांगा करून शालेय प्रार्थना म्हणून  लाईन मध्ये शाळेत इयत्ता दहावी वर्गात आप आपल्या बॅचवर १८ वर्ष  नंतर पुन्हा एकदा बसले होते. पुन्हा एकदा शाळा त्या नेहमी प्रमाणे शालेय वर्गशिक्षिकांनी  हजारे घेतली आणि आपल्या रोल नंबरवर एस सर असा आवाज पुन्हा एकदा विद्यार्थी दशा प्रमाणे शाळेत घुमला शाळेला रविवार सुट्टी असुन देखील सर्व शिक्षकांनी देखील उत्सुफद प्रतिसाद दिला.


पुढील नियोजित कार्यक्रम साईस्पर्श लाॅन या ठिकाणी सरस्वती प्रतिमा पुजन दिपप्रज्वलन करून पुढील कार्यक्रमाचे विद्यार्थी सुत्रसंचलन मिरा म्हस्के  केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी शिक्षक गोवर्धन म्हस्के हे होते. विद्यार्थीनी  सर्व शिक्षकांचा सन्मान केला तसेच जे विद्यार्थी आज आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वी कार्य करत आहे.अशा सर्व विद्यार्थीचा सत्कार सन्मान करण्यात आला.कार्यस्थळी विद्यार्थीनी स्नेहभोजन आनंद घेतला.

या वेळी शालेय मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, मदन गांगडेॅ सर , महादेव नाईक सर, संजय गांगडेॅ सर, सुरेश झांबरे, गोरक्षनाथ काळभोर सर, गोवर्धन म्हस्के सर ,दिपक वाघ, रामदास चितळकर, शिवहरी म्हस्के, अनिल पवार, योगीराज म्हस्के, श्रीकांत सावंत,प्रदिप चितळकर, तुकाराम वाघ, गणेश जाधव, शाम जाधव, प्रकाश शिंदे, महादेव बोचरे, सचिन म्हस्के,गुलाब फुलमाळी,प्रविण अरुणे, सुजित खेगट, चंद्रकांत ढेरे, उर्मिला कालेॅ,सिमा बनकर,साधना म्हस्के,मिरा म्हस्के, मनिषा कासार, पुष्पा औसेकर,छाया थोरात,सिमा कणसे, अर्चना बोचरे, शिल्पा हिंगे,पुनम पोटरे, रुपाली म्हस्के,उपस्थित होते.
close