shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दक्षिण आफ्रिका चोकर्सचा दाग पुसणार ?

          सर्व जगाचे लक्ष लागलेला विश्व कसोटी अजिंक्यपदाचा सामना ११ ते १५ जून या कालावधीत नियोजित असून सुप्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर तो खेळला जाणार असून भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून खेळला जाईल. तसेच या सामन्यासाठी १६ जून हा दिवस राखीव दिन असेल.


                 डब्ल्यूटीसी फायनलसाठी एक दिवसाचा राखीव दिवस असतो, जो पावसामुळे सामना व्यत्यय आणल्यामुळे किंवा कमी प्रकाशामुळे सामना लवकर संपल्याने भरपाई करण्यात येईल. सामना अनिर्णित राहिल्यास                         सन २०२३-२५ डब्ल्यूटीसी चक्रात गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर होता. पण जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर या आधारावर विजेता घोषित केला जात नाही. नियम १६.३.३ नुसार, जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना विजेते घोषित केले जाईल व मिळालेली बक्षीस रक्कम दोन्ही संघांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणाऱ्या संघाला सुमारे ३,६००,००० अमेरिकन डॉलर मिळतील. भारतीय चलनात हे सुमारे ३० कोटी रुपये असेल. उपविजेत्या संघाला, म्हणजेच पराभूत संघाला सुमारे १८ कोटी रुपये मिळतील.

                ११ जूनपूर्वी आणि नंतर लंडनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अहवालानुसार, ११ ते १५ जून दरम्यान शहरात ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता आहे.  लॉर्डसचे मैदान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. इथे चांगला बाउन्स आणि स्विंग मिळतो. पहिल्या डावात येथे सरासरी धावसंख्या ३१० आहे. खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फलंदाजांसाठी आव्हाने अधिक असतील. या सामन्यात ज्या संघाची गोलंदाजी चांगली असेल तो संघ जिंकेल. आतापर्यंत येथे १४७ कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५३ वेळा आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ४३ वेळा विजय मिळविला आहे. 

                यासाठी दोन्ही संघांचे संघ आधीच जाहीर झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा आहे. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडू आहेत जे सामन्याचं पारडं बदलण्यात पटाईत आहेत.

               ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण १०१ कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ५४ सामने जिंकले आहेत. तर आफ्रिकन संघाला फक्त २६ सामने जिंकण्यात यश आले आहे. २१ सामने अनिर्णित राहिले आहेत. अशा परिस्थितीत, कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आपोआप सिद्ध होतो.

                दक्षिण आफ्रिकेने प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा  फायनलमध्ये प्रवेश मिळविला असून आहे. मागच्या सत्राचे  विजेतेपदही त्यांनी जिंकले आहे. अशा परिस्थितीत त्यांचे लक्ष विजेतेपदाचे रक्षण करण्यावरच असेल.

              सन २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे होणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानाची खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँडसारखे जलदगती गोलंदाज आहे. तर दक्षिण आफ्रिकन संघात लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा आणि डेन पॅटरसन यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.

डब्ल्यू २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ असे आहेत: -

ऑस्ट्रेलिया: - पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टॅस्टस, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अ‍ॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर,


दक्षिण आफ्रिका : - टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, विआन मुल्डर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरान मुथुसामी, टोनी डी झोर्जी, रायन मार्कलटन, रायन मार्कलटन

              आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२३-२५ च्या अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसी फायनल  ११-१५ जून दरम्यान ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनाही प्रचंड अनुभव आहे आणि त्यांनी आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. सन २०२४ चा वर्षातील सर्वोत्तम पंच रिचर्ड इलिंगवर्थ सलग तिसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पंच म्हणून काम पाहतील. त्यांनी सन २०२१ आणि २०२३ च्या आवृत्त्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. तर न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पंच म्हणून काम पाहणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०२३ च्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पंचगिरी केली आहे.

              इंग्लंडचे रिचर्ड केटलबरो टीव्ही पंच म्हणून काम पाहतील. केटलबरो २०२१ च्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये देखील पंच होते. भारताचे नितीन मेनन हे चौथे पंच असतील.  डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पंच म्हणून मेनन यांचे हे पदार्पण असेल. माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ, हे अतिशय अनुभव असलेले सामनाधिकारी असतील.

            ऑस्ट्रेलियन संघाची आयसीसी स्पर्धा जिंकण्याची टक्केवारी फार मोठी असून अंतिम सामन्यात पोहोचले तर ते क्वचितच हारतात. या उलट दक्षिण आफ्रिकेची परिस्थिती आहे. निर्णायक सामन्यात लोटांगण घालण्याचा भला थोरला इतिहास त्यांना चिकटला असत्याने आपल्याला मिळालेले 'चोकर्स' चा दाग ते यावेळी राखतात का पुसतात ? या प्रश्नावर संपूर्ण क्रिकेट जगतात काथ्याकूट सुरू आहे.

@. डॉ. दत्ता विघावे                   
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close