shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ससून रुग्णालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी सदाशिव जाधव यांची सदिच्छा भेट…

पुणे : जनसामान्यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे, ससून रुग्णालयातील नावाजलेले व गोरगरिबांचे खरे हितचिंतक म्हणून ओळख असलेले आरोग्य अधिकारी सदाशिव जाधव यांना नुकतीच ससून रुग्णालयात सदिच्छा भेट देण्यात आली.

श्री सदाशिव जाधव आणि श्री रमेश जेठे 

या भेटीदरम्यान रुग्णालयात रुग्णांवर होत असलेली तत्पर सेवा, गरजूंना मिळणारी तातडीची मदत आणि अधिकारी जाधव यांच्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांनी वेळोवेळी गोरगरिब रुग्णांसाठी घेतलेल्या धडपडीमुळे अनेकांचे प्राण वाचले असून, त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.

रुग्णसेवा हेच खरे ईश्वरसेवा मानणाऱ्या जाधव यांच्यासारखे अधिकारी आरोग्य व्यवस्थेतील आधारस्तंभ ठरत आहेत. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वात ससून रुग्णालयातील सेवा अधिक प्रभावीपणे उभारली जात आहे, ही निःसंशय बाब आहे.

ही सदिच्छा भेट सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली असून, त्यांच्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्यांची समाजात नेहमीच गरज आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

close