पुणे प्रतिनिधी:-
राकेश यल्लाप्पा विटकर , सुरक्षा अधिकारी, पुणे महानगरपालिका त्यांच्याच शब्दांत शब्दबद्ध..
आम्हाला खऱ्या अर्थाने घडवलं रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालयातील शिक्षकांनी खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी उभारलेल्या या शाळेतून आम्ही सर्व भाऊ आणि बहीण शिक्षण घेऊन बाहेर पडलो त्यामुळे रयत शिक्षण संस्था ही आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसह शाळेतील मूलभूत सुविधा आणि प्रश्नाकरिता नेहमीच आम्ही भाऊ आणि बहीण आग्रही असतो आमच्यावरती जे संस्कार झाले आणि आम्हाला ज्यांनी घडवलं ते आमच्या मातोश्री माजी नगरसेविका भीमाक्का विटकर पुणे महानगरपालिकेमध्ये 1993 मध्ये रोजंदारी बिगारी या वर्ग चार मधील पदावर महापालिकेत प्रवेश सन 2000 ला लिपिक टंकलेखक या पदावरती प्रथम प्रमोशन 2010 मध्ये वरिष्ठ लिपिक या पदावरचे दुसरे प्रमोशन आणि 2016 मध्ये उपअधीक्षक या पदावर तसेच 2021 पासून सुरक्षा अधिकारी पुणे महापालिका या पदावर आज अखेर कार्यरत 2008 ते 2016 या कालखंडामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह घोले रोड येथे वसतिगृहप्रमुख तथा व्यवस्थापक या पदावरती काम करत असताना महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भामधील ग्रामीण भागातील मुलांकरिता प्रवेश प्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल केला आणि या बदलामुळे अनेक होतकरू अभ्यासू मुलांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभारण्याची मोठी संधी निर्माण करून दिली. अनेक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनिअर शिक्षक प्राध्यापक घडवण्यामध्ये मोलाचा वाटा राहिला राज्यसेवेच्या परीक्षांमध्ये तसेच पूर्व परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक उपजिल्हाधिकारी अशा पदावरती उत्तुंग यश मिळवलेला आहे.
हा माझ्यासाठी एक मोठा आनंदाचा आणि मैलाचा दगड होता असे म्हटले तर हरकत नाही
जगामध्ये कोविड 19 या विषाणूमुळे संपूर्ण जग थांबले असताना पुणे शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मोलमजूर करणाऱ्या कुटुंबासाठी रेशन किट वाटप करणे एक मोठी अवघड जबाबदारी महापालिकेने माझ्यावर सोपवली या जबाबदारीच्या माध्यमातून शहरातील सुमारे एक लाख 50 हजार कुटुंबापर्यंत रेशन यामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
पुणे महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर सुरक्ष रखवालदारांना दरमहाच्या पाच तारखेला नियमित पगार सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांमध्ये निवृत्ती वेतन देण्याची महत्त्वकांक्षी योजना अमलात आणली त्याचबरोबर कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दरमहा दहा तारखेला वेळेवर वेतन त्याचप्रमाणे ई एसआय पी एफ तसेच कर्मचारी चा निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना रुपये दहा हजारापर्यंत ची मदत जाहीर केली आणि ती बाधितांपर्यंत पोहोचवली
तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता महाराष्ट्रामध्ये एक अनोखा सामाजिक कार्यक्रम पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत राबविण्यात आला 25 तृतीयपंथींना सुरक्षा रखवालदार पदाची नोकरी दिली व त्यांना मानसन्मान तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतःच्या पायावर उभारण्याची क्षमता निर्माण करून दिली,नोकरी करत असतानाच आपण ज्या समाजातून आलेलो आहोत त्या समाजातील सर्व घटकांचं एकोपा आणि संघटन निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये आणि गावांमध्ये जाऊन वडार समाज संघाच एकीकरण करणे आणि समाजाला एकसंघ करण्यासाठी वीस वर्ष नोकरी करून संघटनेचे काम केले आहे आणि त्या अनुषंगाने 8 फेब्रुवारी 2012 रोजी नांदेडच्या तंत्रनिकेतन कॉलेजच्या मैदानावर वडार समाजाचा सुमारे एक लाख लोकांचा सामाजिक मेळावा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि माझ्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
त्याचप्रमाणे 3 जून 2017 रोजी लातूर येते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भव्य असा सामाजिक मेळावा संपन्न करण्याकरिता यशस्वी प्रयत्न केले.
पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ सुरक्षा अधिकारी राकेश विटकर हे केवळ आपल्या शासकीय कर्तव्यास निष्ठेने पार पाडतात इतकेच नव्हे, तर ते समाजातील गोरगरिबांच्या दुःखद वेदनांना समजून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
आपल्या रोजच्या नोकरीतून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जपत, राकेश विटकर हे अनेक गरीब, उपेक्षित, आणि गरजूंना मदतीचा हात पुढे करतात. त्यांनी अनेक वेळा गोरगरिबांच्या तक्रारींना प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या माणूसकीच्या सेवेस अनेकांना दिलासा मिळालेला आहे.
कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टींचं अचूक संतुलन साधणारे राकेश विटकर हे पुणे मनपाच्या व्यवस्थापनात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. अशा या सेवाभावी अधिकाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
माहिती संकलन
रमेश जेठे (सर)