इंदापूर : पळसदेव-(१६ जून) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. चिमुकल्यांच्या किलबिलटांनी शाळेचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा सुरू झाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी खास व अविस्मरणीय व्हावा यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शालेय परिवहनाची पूजा करण्यात आली.तसेच शालेय आवारात विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी आकर्षक रांगोळी, तोरण, फुलांनी आणि फुग्याने सजविलेला व्हरांडा, आकर्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी सजविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते फित कट करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प, चॉकलेट तसेच स्मायली व शुभेच्छा कार्ड देऊन करण्यात आले. शाळेतील सहशिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले तसेच माय फर्स्ट डे या सेल्फी पॉइंट मध्ये विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, सचिव नितीन बनसुडे,प्रिन्सिपल वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उप मुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, तनुजा फुगे, सीमा बाराते, प्रवीण मदने, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे तर आयुष्य घडवणारे सुंदर विश्व"आहे म्हणूनच शाळेचा पहिला दिवस हा आनंद मेळावा म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मारकड यांनी केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App