प्रतिनिधी :- पिंपळे खु तालुका अमळनेर येथील बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशनचे निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले.
यावेळी बालिका स्नेही पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील व सदस्यांनी तसेच प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच अनमोल सहकारी ओम साई क्लासेस चे संचालक ज्ञानेश्वर पाटील सर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य स्वच्छता विषयी व गावात स्वच्छता पावसाचे दिवस चालू असताना डेंगू मलेरिया यापासून आपले स्वतःचे व गावकऱ्यांचे आरोग्य कसे सुरक्षित राहील याविषयी स्वच्छ भारत मिशन या निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला व खूप सुंदर लिखाण केले व गावातील सर्व ग्रामस्थांनी बालिका स्नेह पंचायतचे कौतुक केले बालिका स्नेही पंचायत सरपंच गायत्री विनोद पाटील यांनी पुढील काळात त विविध उपक्रम राबू अशी एक संकल्पना केली.