अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत नवी दिल्ली साहित्य भारती शाखा धुळे तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका वैशाली पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.मृदुला वर्मा व प्रमुख अतिथी श्री . अविनाश पाटील, प्रा.डॉ. शारदा मोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारतीचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉ योगेश पाटील व विभागीय समन्वयक प्राचार्य डॉ.संजीव गिरासे यांनी केले.
यावेळी राहणार पिंपळे तालुका अमळनेर कार्यरत धुळे येथे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अविनाश पाटील यांनी गुरुपौर्णिमेबद्दल बोलताना गुरु व शिष्याची महिमा सांगितली. आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे महत्व व मार्गदर्शन खूप मोलाचे असते ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचे सोन्यात रूपांतर होते त्याच पद्धतीने जर एखाद्या शिष्याला त्याच्या आयुष्यामध्ये चांगले गुरू लाभले तर त्याच्या आयुष्याला दिशा मिळत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतःला मिळालेले आजपर्यंतचे गुरुवर्य असे अविनाश पाटील म्हणाले. लहानपणी शाळेमध्ये शिकत असताना त्यांना नेतकर गुरुजी जाधव गुरुजी सैंदाणे गुरुजी लाभले ज्यांनी सरांच्या आयुष्याला दिशा दिली. समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांकडून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा काहीतरी चांगलं देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे असं मत सरांनी यावेळी व्यक्त केल. एकमेकांकडून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे सेवा बजावण्यामध्ये खऱ्या अर्थाने समाधान आहे आणि समाजातील प्रगती देखील आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आज शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने अध्यापन करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची गरज आहे तरच भविष्यात राष्ट्र उभारण्यासाठी चांगले नागरिक तयार होतील म्हणून शिक्षकांना अध्यापनाचं काम करू द्यावं आणि शिक्षकांनी देखील ते प्रामाणिकपणे करावं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केल या निमित्ताने सरांनी शाळेमध्ये राबवलेले विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली. आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होत असते आणि ती कायमस्वरूपी टिकते यावर माझा ठाम विश्वास असल्याचे सरांनी सांगितले. कार्यक्रमाला धुळे शहरातील साहित्य प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम अमृतकर यांनी केले तर स्वागत गीत प्रा.उज्वला वाणी यांनी सादर केले आभार प्रकाश कुलकर्णी यांनी मानले.