श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शहिद स्मारकास आजी-माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने सिक्कीम मधील डोकलाम याठिकाणी सेवेत असलेले मेजर सचिन पवार व सियाचीन ग्लेशियर या अतिसंवेदनशील सिमेवर तैनात असलेले ऋषिकेश चव्हाण आपल्या देशाची सध्या सेवा करत असलेल्या या दोन्ही जवानांच्या हस्ते, ज्या सैनिकांनी (दि.३ मे रोजी सुरू झालेल्या व २६ जुलै १९९९ रोजी समाप्त झालेल्या) या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण आदरांजली म्हणून शहीद स्मारकास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. या युद्धात लष्कराने ऑपरेशन विजय अंतर्गत कारगिल द्रास आणि बटालिक परिसरात शत्रूंचा पराभव करून शत्रूच्या ताब्यात असलेला सीमा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला या लढ्यामध्ये ५२७ भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली त्यात कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टीनेंटअनुज नायर, ग्रेनेडियर शिपाई योगेंद्र यादव या वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले, अशा अनेक शूरवीरांचा या लढाईमध्ये समावेश होता.
पाकिस्तानची ही नापाक हरकत कोशिश आणि बुजदील हरकत ३ मे ला सुरू होऊन २६ जुलै १९९९ रोजी समाप्त झाली. त्यामध्ये भारत देशाने टोलोलिंग पहाडी ,टायगर हिल ,पॉईंट ४८७५ आणि ५१४० आपल्या ताब्यात घेतले या लढाईमध्ये तिन्ही सेनेच्या जिगरबाज सैनिकांनी जिवाची बाजी लावून देशाला विजय हाशील करून दिला म्हणून आजच्या दिनी देशभरात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली द्रास वार मेमोरियल, दिल्लीतील अमर जवान ज्योती तसेच अनेक शाळा ,महाविद्यालय ,आणि संस्थांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कारगिल विजय दिवस हा केवळ सैनिकी विजयाचा नसून भारताच्या एकतेचा धैर्याचा आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो कारगिल शूरवीर हेच खरे या देशाचे हिरो आहेत आपण कोणीही शूरवीरांचे बलिदान विसरू नये आणि त्यांच्या आदर्शा नुसार देश सेवेचे मूल्य सर्व भारतीयांनी जोपासावे आणि आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास यांनी मत प्रकट केले या कार्यक्रमाला मेजर कृष्णा सरदार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब भागडे,संग्राम यादव, सुनील भालेराव, विलास खर्डे , अशोक कायगुडे, अशोक साबळे, भगिरथ पवार,शरद तांबे, गोरक्षनाथ बनकर, बाळासाहेब बनकर, राजेंद्र कांदे, श्रीमती छाया मोटे, ऋषिकेश चव्हाण, सचिन पवार, ऋषिकेश चव्हाण, प्रतिक्षा भागडे रमेश माळी, कैलास खंडागळे व श्रीराम कलर वर्ल्ड चे मालक रामचंद्र सुगुर इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व शुरवीर जवानांना आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने शतशत नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
*वृत्त विशेष सहयोग*
मेजर कृष्णा सरदार, श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111