shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंगरूळ ते पिंपळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य...!

 अमळनेर (प्रतिनिधी) :तालुक्यातील मंगरूळ ते पिंपळे रस्त्याचे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे काम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अवघे दीड-दोन महिने होत नाहीत तोच नवीन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे.

मंगरूळ ते पिंपळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य – काम सुरू असतानाच निकृष्ट दर्जा उजेडात!

रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसताना, जेवढे काम झाले आहे त्यावरही खड्डे पडलेले दिसत आहेत. साइड पट्ट्यांचे काम न झाल्याने आणि रस्त्याच्या बाजू भरल्या न गेल्याने, रस्त्याच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिल्लक असलेल्या सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी व मोठ्या वाहनांना खड्डे चुकवत प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघातही घडले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

📢 सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त आवाज:

 "रस्ता बनवायला दीड महिना ते दोन महिने होत नाही तेवढ्यातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे."
— युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे


close