धरणगाव प्रतिनिधी --
धरणगाव -- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी पिंपळेकर संजय पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने तसेच पक्षाचे संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून (1999) फाउंडर सदस्य असलेल्या निष्ठावंत लोकांना या निमित्ताने न्याय मिळाला. यामध्ये पिंपळेकर संजय संतोषराव पाटील यांची धरणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष पदावर पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, महिला तालुकाध्यक्षपदी सोनवद च्या माजी सरपंच आशा उज्वल पाटील तसेच तालुका कार्याध्यक्ष पदावर पक्षाचे सक्रिय सदस्य बांभोरीचे हितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आपल्या माध्यमातून पक्षाचे संघटन मजबूत झाले पाहिजे तसेच पवार साहेबांचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आपल्या माध्यमातून सर्व फ्रंटलंच्या नियुक्त्या लवकरच होतील अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन, जेष्ठ नेते प्रा एन डी पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्वल पाटील, धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, प्रा आकाश बिवाल, घनश्याम कुंभार, ग्रंथपाल मोहन पाटील, दिनेश भदाणे उपस्थित होते.