१ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार
प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी
२०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार पत्रकार तात्या गवळी यांना नुकताच जाहीर झाला असून दिनांक १ ऑगस्ट रोजी २०२५ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कै. प्रमोद लांडगे युवा मंच यांच्या वतीने दलित चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांना व दलित चळवळीला आपल्या दमदार व धारदार लेखणीच्या माध्यमातून न्याय देणाऱ्या पत्रकारितेतील नामांकित पत्रकार यांना लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येत असल्याने
यावर्षीचा कै. प्रमोद लांडगे युवा मंच यांच्यावतीने देण्यात येणारा २०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार हा पत्रकार तात्या लहू गवळी यांना नुकताच जाहीर करण्यात आला असून दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सिद्धार्थ नगर,केज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांमध्ये पत्रकार तात्या गवळी यांना लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. असे २०२५ च्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रेम लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या निवडीबद्दल पत्रकार तात्या गवळी यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.