shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🔥 श्रीरामपूरात भीषण खळबळ! 🔥भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मान्य न झाल्याने कट्टर भीमसैनिकाने पेटवली संतापाची ज्वाला – आत्मदहनाचा थरकाप उडवणारा प्रयत्न !

श्रीरामपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. कट्टर भीमसैनिक मनोज काळे यांनी याआधीच प्रशासनाला इशारा दिला होता की, मागणी न मानल्यास आत्मदहन केले जाईल!


आज, 18 जुलै 2025 रोजी, अखेर मनोज काळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर येत ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवण्याचा थरकाप उडवणारा प्रयत्न केला! काही क्षणातच परिसरात घबराट, आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या भयावह प्रसंगात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक समाधान सोळंके आणि त्यांच्या पथकाने तत्परतेने धाव घेत काळे यांना जळण्यापासून वाचवले. त्यांना तातडीने पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

काही काळासाठी नगरपालिकेसमोर तणावपूर्ण परिस्थिती, भीमसैनिकांची गर्दी, घोषणाबाजीने परिसर दणाणला!
✅ लोकांच्या रोषाचा ज्वालामुखी फुटण्याची शक्यता निर्माण, प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया!

👉 “डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारला नाही तर पुढील वेळी आमच्या जिवाचंही काही खात्री नाही!” – भीमसैनिकांचा इशारा!

या घटनेनंतर शहरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

📢 श्रीरामपूरमध्ये आता पुढे काय होणार? प्रशासन झोपेतून जागं होईल का? भीमसैनिकांचा संताप अजून भडकणार का?


close