शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी कोट्यवधी भाविक दररोज शिर्डीत येत असतात. परंतु श्रद्धाळूंच्या भावनांवर पाणी फेरत काही बेफिकीर दुकानदारांनी ‘तीर्थक्षेत्रातील सेवा’ या पवित्र संकल्पनेला काळीमा फासल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मंदिरात केवळ हार अर्पण करण्याचीच परवानगी असताना, बाहेरील दुकानदार जबरदस्तीने भाविकांना ₹२,५०० रुपयांचे ताट विकून त्यात मंदिरात स्वीकारले जातही नाहीत अशा अनेक वस्तू घालून ‘लुटमारी’ करत असल्याची तक्रार समोर आली आहे.
आजच विदर्भातील वडार समाज संघाचे विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर , माजी नगरसेवक व भावी आमदार व बसपा जिल्हा अध्यक्ष, अमरावती चे अजयभाऊ गोंडाणे, शासकीय ठेकेदार व जिल्हा अध्यक्ष वठर समाज, अमरावती सुनील वरठे, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव वेताळकर, शासकीय ठेकेदार राजू अण्णा पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या भाविकांना हा कडवट अनुभव आला. ते शिर्डी एक्सप्रेसला भेट देताना संतापाने म्हणाले,
“शिर्डीच्या नावाखाली श्रद्धाळूंची लूट केली जाते का? श्रद्धाळू मंदिरात भक्तिभावाने जातात, पण दुकानदार मात्र भीक मागत नाहीत तर बळजबरीने लुटमार करतात. मंदिरात स्वीकारले जात नाहीत अशा वस्तू देऊन श्रद्धाळूंना फसवले जाते, हा कोणता व्यवसाय? याकडे प्रशासन आणि शिर्डी संस्थानचं लक्ष नाही का?”
❗ श्रद्धाळूंच्या भावनांची पायमल्ली
- मंदिरात फक्त हार ठेवण्याची परवानगी, तरी दुकानदार जबरदस्तीने महागड्या ताटांची विक्री करतात.
- भाविकांना सांगितले जाते की “या ताटाशिवाय दर्शन होत नाही” – अशी भ्रमित करणारी माहिती देऊन पैसे उकळले जातात.
- ताटात ठेवलेली अनेक वस्तू मंदिरात स्वीकारल्या जात नाहीत, त्यामुळे श्रद्धाळूंचे पैसे वाया जातात.
- बाहेरील गावातील निरपराध भाविकांना फसवून तीर्थक्षेत्रातील सेवेला कलंक लावला जात आहे.
❗ भविष्यात शिर्डीची बदनामी होणार नाही का?
जर ही लुटमारीची साखळी थांबली नाही, तर लवकरच शिर्डीची प्रतिमा कलंकित होईल. साईबाबांच्या नावाने श्रद्धाळूंना लुटणे हे पाप आहे, परंतु याकडे पाहणारे कोणीच नसल्याने दुकानदारांची मनमानी सुरूच आहे. यामुळे
- शिर्डीतील पर्यटन व तीर्थक्षेत्रावर नकारात्मक परिणाम होईल,
- भाविकांचा विश्वास डळमळीत होईल,
- आणि शिर्डीची कीर्ती जगभरात वाईट नावाने ओळखली जाईल.
❗ प्रशासनाची भूमिका कुठे आहे?
- शिर्डी संस्थान, नगरपरिषद, आणि स्थानिक पोलिस प्रशासन काय करत आहे?
- श्रद्धाळूंचे संरक्षण करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहेत?
- शिर्डी परिसरात अनधिकृत दुकानदारांवर कारवाई का होत नाही?
❗ शिर्डी संस्थान खडबडून जागे व्हावे!
शिर्डी एक्सप्रेस प्रशासनाला आणि शिर्डी संस्थानला स्पष्ट इशारा देत आहे की, भाविकांची फसवणूक बंद करण्यासाठी तातडीची पावले उचलली पाहिजेत.
- दुकानदारांची मनमानी थांबवण्यासाठी कडक नियमावली करावी.
- भाविकांना योग्य माहिती देणारे सूचना फलक लावावेत.
- लुटमारी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी.
साईबाबांचे नाव घेऊन श्रद्धाळूंची लूट सहन केली जाणार नाही. भाविकांची लूट थांबवा, अन्यथा साईभक्त जनतेचा आवाज प्रचंड तीव्रतेने उठेल!
📢 शिर्डी संस्थान, प्रशासन, आणि पोलीस यंत्रणा – आता तरी जागे व्हा! श्रद्धाळूंच्या भावनांचा आदर करा, लुटमारीचा व्यवसाय थांबवा!