shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

बावडा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना   अभिवादन.
 
लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : बावडा (ता. इंदापूर ) येथे   लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या स्मुर्ती दिना निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार  घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी १८ जुलै  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एक प्रतिभावंत साहित्यिक नव्हते, तर ते श्रमिक, दलित, शोषित वर्गाचे खरे प्रवक्ते होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील पीडित वर्गाचे दुःख, संघर्ष आणि स्वप्नं जगासमोर ठामपणे मांडली.
अण्णाभाऊंनी तमाशा, पोवाडा आणि लोकनाट्य या माध्यमांतून समाजजागृतीचं अद्वितीय कार्य केलं. त्यांच्या लेखनात दलितांच्या वेदना, उपेक्षा आणि संघर्ष जशा रेखाटल्या आहेत, तसंच परिवर्तनाची दिशा आणि प्रेरणाही दिली आहे.अशा या थोर साहित्यिक, समाजसुधारक, लोकशाहीर आणि क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अशा  शब्दात मांतग एकता आंदोलन संघटनेचे इंदापुर तालुका अध्यक्ष शरद गायकवाड यांनी विनम्र अभिवादन केले.

 यावेळी सतिष गायकवाड, छगन गायकवाड, बाळु गायकवाड,   महादेव कांबळे, अनिल कांबळे, प्रतिक घोगरे, राजु घोगरे, ग्रा. प.सदस्य पांडुरंग कांबळे,चिंतामणी गायकवाड,समाधान भोसले, विशाल कांबळे,दर्शन गायकवाड व इतर अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
close