रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ संपन्न.
इंदापूर : दि 17 जुलै 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ इंदापूर चा पदग्रहण समारंभ रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांच्या अध्यक्षतेखाली व असिस्टंट गव्हर्नर डॉ. राजेश दाते यांच्या व रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर व संस्थापक व उपाध्यक्ष मुकुंद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी रोटरी वर्ष 2025 - 26 चे अध्यक्ष म्हणून नितीन शहा व सचिवपदी प्रशांत घुले व खजिनदार म्हणून मनोहर बेद्रे यांनी पदभार स्वीकारला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री मराठे यांनी रोटरीचे पुणे जिल्ह्यातील चालू असलेले प्रोजेक्ट तसेच शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात रोटरी करत असलेली कामे याची माहिती दिली.
तसेच प्रदीप गारटकर यांनी रोटरी क्लब इंदापूरची स्थापन झाल्यापासून केलेल्या विविध सामाजिक कार्याचे माहिती सांगितली व नूतन अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुकुंद शहा यांनी रोटरीची सामाजिक परंपरा व रोटरी ची उद्दिष्टे याची माहिती दिली.
रोटरीचे आयडिया स्टडी ॲप च्या बद्दल माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांनी दिली व वर्षांमध्ये पन्नास हजार ॲप गरजू मुलांकरता उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
नूतन अध्यक्ष नितीन शहा यांनी आपल्या मनोगतात येणाऱ्या वर्षात करावयाची रोटरी ची कामे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे आयडियल स्टडी ॲप याचे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे सांगितले. तसेच लसीकरण व रक्तदान शिबिरे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याचे उद्दिष्ट सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मागील वर्षात केलेल्या कामाचा आढावा माजी अध्यक्ष रो. मोरेश्वर कोकरे यांनी दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रशांत घुले यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सभासदांनी कष्ट घेतले.
यावेळी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर राजेश राऊत, डिस्ट्रिक्ट को डायरेक्टर आप्पा इंगळे, फरसुले साहेब, बारामतीत कक्ष अध्यक्ष रविकिरण खारतोडे, दौंड क्लब चे अध्यक्ष दीपक शासम, रोटरी 3131 असिस्टंट गव्हर्नर नरेंद्र गांधी,डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर राजेश राऊत,
डिस्ट्रिक्ट कॉन्फरेन्स को डायरेक्टर डॉ. संजय इंगळे,टीआरएफ झोनल को डायरेक्टर नितीन दोशी
तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.