shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रम..


नोमॅडिक वेल्फेअर असोसिएशन आणि व सांस्कृतिक कला मंच ,छत्रपती संभाजी नगर, यांच्या संयुक्त विद्यमाने हरितक्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मंगळवार दिनांक ०१.०७.२०२५ रोजी, साने गुरुजी नगर उद्यान येथे एक कार्यक्रम आयोजित केला होती. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री अंबादास  रगडे साहेब होते,  नाईक साहेबांच्या प्रतिमेला सर्व उपस्थीतांनी पुष्पहार घालून,पुष्प अर्पण करून अभिवादन केले..अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली..या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जैष्ठ साहित्यिक श्री टी एस चव्हाण, सांस्कृतिक कला मंच चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री एकनाथजी त्रिभुवन अण्णा, आणि  भटक्या विमुक्त आणि जमातीच्या तीसऱ्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री किशन पवार सर हजर होते. या सर्व मान्यवरांनी वसंतरावजी नाईक साहेबांच्या जिवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषण संपल्यावर अरविंद अवसरमल यांनी आभारप्रदर्शन केले..श्री किशन पवार सरांच्या घरी चहापाणी घेऊन कार्यक्रम संपला..कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचलन श्री पुंडलिक धनगर यांनी केले होते. ह्या कार्यक्रमाला, श्री आसारामजी गायकवाड , अरविंद अवसरमल आणि बाबासाहेब निकाळजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजगुरु यांनी विशेष परिश्रम घेतले.
close