अँकर्स असोसिएशन तर्फे भूमिपुत्रांचा गौरव
वडाळा महादेव [ प्रतिनीधी ] - फुलांचा हार
नजरेला मनमोहक दिसतो मात्र फक्त फुले असून उपयोग नाही तर त्यांना एकत्रित गुंफणारा दोरा महत्त्वाचा असतो अगदी याचप्रमाणे एखादा कार्यक्रम समारंभ बहारदार करण्यात सूत्रसंचालकाचा वाटा मोठा असून सूत्रसंचालक म्हणजे शब्द फुलांच्या माध्यमातून कार्यक्रम सुंदरपणे गुंफणारा अलवार धागा असल्याचे प्रतिपादन येथील रा.ब. नारायण राव बोरावके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व व्याख्याते प्रा. लक्ष्मण कोल्हे यांनी केले आहे. येथील अँकर असोसिएशनच्या वतीने आयोजित 'गौरव भूमिपुत्राचा" या मालिकेतील पाचव्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. मंचावर आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, कवियत्री संगीता फासाटे ,पत्रकार मिनाक्षी राजेंद्र देसाई, संदेशदूत राजेंद्र करंकाय ,योगा खेळाडू अथर्व कोरडे यांचे वडील रत्नाकर कोरडे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय निवड अवधूत कुलकर्णी यांनी केली तर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविकात बोलताना अँकर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रा. आदिनाथ जोशी म्हणाले की आतापर्यंत श्रीरामपूर तालुका परिसरातील विविध क्षेत्रात ऊल्लेखनीय कार्य करणाऱ्या १७ भूमीपूत्रांचा गौरव करण्यात आला असून सत्कार हे पुढील वाटचालीस प्रेरणा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व सत्कारमुर्तींचा परिचय
विद्यमान कार्याध्यक्ष संतोष मते यांनी करून दिला.
महाराष्ट्र शासनाच्या समाज- कल्याण विभागाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, राज्यस्तरीय ‘नारीशक्ती पुरस्कार ‘ मिळाल्याबद्दल कवियत्री संगीता फासाटे, जिल्हास्तरीय ‘ वृक्षभूषण ‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार राजेंद्र देसाई, अव्याहत समाजसेवा करणारे संदेशदूत व फलक लेखक राजेंद्र करंकाय तसेच ४९ व्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे अथर्व कोरडे
यांचा असोसिएशनच्या वतीने बेलाच्या झाडाचे रोप व स्नेहवस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच नुकतेच पवित्र "हज यात्रा" पूर्ण करून आल्याबद्दल
प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व असोशिएशनचे मार्गदर्शक सलीम खान पठाण सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व सत्कारार्थींनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच "भूमिपुत्र गौरव" केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सत्काराने आमची सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे सत्काराला उत्तर देतानात्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा सतीश म्हसे, प्रा विनायक कुलकर्णी, विलास कुलकर्णी,दिनकर कोरडे, अशोक कटारे, श्रीवेद देसाई आदीसह अँकर असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान उपाध्यक्ष प्रसन्न धुमाळ यांनी तर आभार प्रदर्शन सौ मयुरी थावरे- पिंगळे यांनी केले