shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा.

दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा.

एरंडोल
: दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली राममृत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष अमित पाटील यांनी भूषविले. यावेळी प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. बी. गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ग्रंथपाल डॉ. शर्मिला गाडगे यांनी प्रास्ताविकातून डॉ. रंगनाथन यांचा जीवन परिचय व ग्रंथालय क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रा. ए. टी. चिमकर, प्रा. व्ही. के. गाढे, डॉ. मीना काळे, डॉ. रेखा साळुंखे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहाय्यक ग्रंथपाल नितीन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन पाटील, छाया पवार व सतीश अहिरे यांनी परिश्रम घेतले.


close