shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुक्यात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

तालुक्यात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

 प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यात व शहरात भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन विविध सामाजिक, शैक्षणिक, शासकीय व राजकीय संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

एरंडोल तालुक्यातील सर्वात जुनी व मोठी शाळा रा.ती. काबरे विद्यालयाच्या पटांगणावर प्रमुख कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्याध्यापक एस.एस. राठी, उपमुख्याध्यापक पी.एच. नेटके व पर्यवेक्षक पी.एस. नारखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चिटणीस राजीव मणियार, सहचिटणीस धीरज काबरे, शालेय समितीचे चेअरमन अनिल बिर्ला, जगदीश बिर्ला, सदस्य सतिष परदेशी, परेश बिर्ला, सतिष काबरे, सल्लागार ॲड. विलास काबरे, ॲड. महेश काबरे, ॲड. कैलास भाटिया, तसेच अनेक माजी विद्यार्थी, पालक, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भाजप जिल्हा उपाध्यक्षा पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सचिन विसपुते, मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सुनील ठाकरे, क्रीडा शिक्षक रोहित सपकाळे, इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बोरसे, खुशबू महाजन व खुशी माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका ज्योती वडगावकर यांनी मानले.

तर, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संस्थाध्यक्ष प्रसाद काबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी दिनेश काबरे, अनिल काबरे, शंतनु काबरे, गौतम काबरे उपस्थित होते. शाळेतील सर्व उपक्रम उपाध्यक्षा पियुषा काबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष प्रसाद काबरे यांनी केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शहरात प्रभातफेरी काढली. विविध वेशभूषा साकारत, नाटिकांद्वारे स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांना अभिवादन केले. देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.

close