shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल.जी. बनसुडे विद्यालयात रोटरी क्लबतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲप्स वाटप

एल.जी. बनसुडे विद्यालयात रोटरी क्लबतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲप्स वाटप
इंदापूर : गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालय, पळसदेव येथे रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना स्टडी ॲप्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची शैक्षणिक प्रगती साधणे हा आहे.

कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष नितिन शहा, सदस्य भीमाशंकर जाधव व प्रमोद भंडारी संस्थेचे अध्यक्ष आ. हनुमंत नाना बनसुडे, सचिव नितीन बनसुडे , प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे ,उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रवीण मदने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
close