shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री केदारेश्वर, पाताळेश्वर, उत्तरेश्वर, गव्हाणकुंड येथील श्री कपिलेश्वर देवस्थांन येथे भाविकांची अलोट गर्दी

श्री केदारेश्वर देवस्थान येथील शिवलिंग दररोज नव नविन फुलांनी कैलाश उपाध्याय यांच्या परिवाराकडून सजविण्याचा मानस

श्रावण मासातिल तिसरा श्रावण सोमवार विशेष ....

निखिल बावणे / वरुड (जि.अमरावती)::
संत्रा नगरी वरुड शहरातील श्री केदारेश्वर देवस्थातील शिवलिंगाचे श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन घेतले, तर विधिवत पूजाअर्चा सुद्धा केली 
या वेळी विविधरंगी फुलांनी श्री केदारेश्वर मंदिर सजविण्यात आले होते. 

 वरुड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शिवभक्त कैलाश उपाध्याय व त्यांचा परिवार हे सन २०१८ पासून नित्य नियमाने श्रावण मासा मध्ये  श्री केदारेश्वर देवस्थान येथे शिवलिंगाचा रुद्राभिषेक करून नित्य नियमाने रोज रात्री १० वाजता पासून रुद्र अभिषेक  करून शिवलिंगाला नव नविन फुंलांनी सजवितात या करिता नंदुभाऊ फुलवाले हे नागपूर वरून  श्री उपाध्याय  यांना फुले उपलब्ध करून देतात शिवलिंगाला फुलांचा  साज घालण्या करिता साधारण उपाध्याय परिवाराला रात्रीला तिन तास लागतात कधी कधी रात्रीचे २ सुद्धा वाजतान त्या नंतर सौ. संगिता व श्री कैलाश उपाध्याय हे दापंत्य शयन आरती पुजा पाठ करून भोग लावला जातो या करिता देवस्थानचे पुजारी निखिल तिवारी यांचे सहकार्य लाभते श्रावण मासांतिल हिन्दी व मराठी बांधवांच्या पुजे प्रमाणे ४५ दिवस हा उपक्रम नित्य नियमाने श्री कैलाश उपाध्याय परिवार राबवित आहे या करिता त्यांना त्यांच्या पत्नी सौ. संगिता कैलाश उपाध्याय डॉ पवन. डॉ. सिद्धार्थ कैलाश उपाध्याय यांचे सहकार्य लाभते कुठल्या हि धार्मिक कार्यामध्ये उपाध्याय परिवार सतत अग्रेसर असतात .धर्म रक्षण. संस्कृती चे जतन करण्या करिता हे परिवार  सतत झटत असतात . श्री केदारेश्वर मंदिर हे चौथ्या शतकातील शिवमंदिर आहे. तसेच वरुड शहरातील साखरपुरा परिसरातील श्री पाताळेश्वर मंदिर व शहरातीलच खडपेंड परिसरातील श्री उत्तरेश्वर मंदिर तसेच श्री क्षेत्र गव्हाणकुंड येथील श्री कपिलेश्वर मंदिरातसुद्धा भाविकांची अलोट गर्दी या वेळी पहावयास मिळाली या वेळी . शिवभक्तांनी बेलपत्री वाहून शिवनामाचा जप केला. श्रावण मासानिमित्त तिसर्या श्रावण सोमवार निमित्त शहरातील श्री केदारेश्वर, श्री पाताळेश्वर आणि श्री उत्तरेश्वर शिवलिंगाची शिवभक्तांनी पूजा केली. जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. विविधरंगी फुलांनी शिवलिंग सजविण्यात आले होते. संस्थानच्या विश्वस्त मंडळाने महापूजा केली. श्री क्षेत्र गव्हाणकुंड येथील श्री कपिलेश्वर शिवलिंगाचे शेकडो शिवभक्तांनी दर्शन घेतले. धार्मिक कार्यक्रम तसेच शिवपुराणाचेही वाचन सुद्धा शिव भक्तांच्या वतिने करण्यात आले. या वेळी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते हे मात्र विशेष..

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
close