shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अडबंगनाथ तपोभूमी भामानगर येथे एकदिवसीय संक्षिप्त नवनाथ पारायण

🚩 जय हरी आदेश 🚩

श्रावण महिना हा सनातन हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार व्रत, वैकल्य, पूजा, अनुष्ठान व पारायणासाठी सर्वाधिक पुण्यदायी मानला जातो. या पवित्र महिन्यात अनेक भक्त विविध ग्रंथांचे पारायण करतात. नवनाथ ग्रंथ हा अशा फलदायी ग्रंथांपैकी एक असून, याचे श्रवण व पारायण करणाऱ्यास सुख, समाधान आणि शांती लाभते, असा विश्वास आहे.



मात्र मूळ नवनाथ ग्रंथात ४० अध्याय आणि सुमारे ७,६०० ओव्या असल्यामुळे, अनेक भाविकांना आजच्या व्यस्त जीवनशैलीत संपूर्ण पारायण करण्यास वेळ मिळत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन, स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री निळकंठराव तरकासे (बाबूजी) यांच्या लेखणीतून, अडबंगनाथ तपोभूमी मंदिर, भामानगर येथे संक्षिप्त श्री नवनाथ पारायण गाथा हा नवीन ग्रंथ निर्माण करण्यात आला आहे.

या संक्षिप्त आवृत्तीतही ४० अध्याय आहेत, पण ओव्या फक्त १,३००, ज्यामुळे हे पारायण एका दिवसात पूर्ण होऊ शकते. या ग्रंथाचे प्रकाशन ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर झाले.

१५ ऑगस्टला सामुदायिक एकदिवसीय पारायण

या नवीन ग्रंथाचे सामुदायिक एकदिवसीय पारायण १५ ऑगस्ट, गोकुळ अष्टमी महापर्व या दिवशी श्री क्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी मंदिर, भामानगर (भामाठाण), ता. श्रीरामपूर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
भक्तांनी या पारायणात सहभागी होण्यासाठी संस्थानाशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महाप्रसादासाठी सहकार्याचे आवाहन

कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या भाविकांना महाप्रसादासाठी सहकार्य करायचे आहे त्यांनी ऑनलाईन (Google Pay / PhonePe - 9921773005) किंवा प्रत्यक्ष हजेरी लावून सहकार्य करावे.

संपर्क

📞 7588605305
📞 7020902470

आवाहन:
"जन्मोजन्मीच्या भाग्याने हा पवित्र योग लाभतो. अशा संधीचा लाभ घ्यावा; कारण ऐशा लाभा जो चुकला, तुका म्हणे वाया गेला."

close