एरंडोल – रा. ति. काबरे विद्यालयात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंगलमय वातावरणात गणेशमूर्तीचे आगमन झाले. विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात बाप्पांचे स्वागत केले.
या स्वागतप्रसंगी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. काकाश्री शरदचंद्र जी काबरे तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री. राजूभाऊ मणियार, श्री. अनिलभाऊ बिर्ला, श्री. परेशभाऊ बिर्ला, डॉ. नितीनभाऊ राठी, श्री. सतीशभाऊ परदेशी आणि श्री. सुनिलभाऊ बिर्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्याध्यापक श्री. जी. एन. लढे सर यांच्या हस्ते सपत्नीक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी रा. ति. काबरे विद्यालय व रा. हि. जाजू विद्यामंदिराचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशपूजनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजन, श्लोकपठण, नृत्य व अभंग यामुळे सभागृह भक्तिरसात रंगून गेले. संपूर्ण शाळेत “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले.
हा सोहळा विद्यार्थी परिषद व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.