घरातून बाहेर पडताना अचानक आलेली चक्कर ठरली जीवघेणी, परिसरात हळहळ.
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द गावात सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. दीपक सुखदेव हटकर (वय २८) या तरुणाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे.
दीपक हटकर हे आपल्या घरातून काही कामासाठी बाहेर पडत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. यात ते बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या अकस्मात मृत्यूमुळे पिंपळकोठा खुर्द गावात शोककळा पसरली आहे. एरंडोल पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, हवालदार संदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.