शिर्डी:-वसुधरेचा ठेवा जपणे, सृष्टीचा सन्मान राखणे आणि निसर्गरक्षणासाठी सज्ज राहणे हा संदेश देत जागतिक आदिवासी दिन शिर्डीत उत्साहात साजरा करण्यात आला. “निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही, आदिवासी म्हणुनी आम्हा आहे अभिमान” या घोषणांनी परिसर दुमदुमला.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २३ डिसेंबर १९९४ रोजी ही घोषणा केली होती. जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यामागचा उद्देश जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या संस्कृतीचा आदर राखणे आणि त्यांच्या योगदानाची नोंद घेणे हा आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीर एकलव्य प्रतिष्ठाण, शिर्डी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेवक किरणभाऊ बर्डे, शंकर बर्डे, अंकुश पिंपळे, बाबासाहेब बर्डे, तुकाराम आलोट आणि शिर्डी शहराध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी क्रांतिकारक तसेच सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास वीर एकलव्य प्रतिष्ठाण उपाध्यक्ष राजेंद्र बर्डे, बापू पवार, सोपान बर्डे, रवि पवार, दिपक बर्डे, तुषार शेजवळ, राजू पंजाळ, गणेश बर्डे, विनोद माळी, किशोर बर्डे, अनिल बर्डे, रामनाथ बर्डे, संतोष बर्डे, भाऊसाहेब पवार, गणेश मोरे, संदीप बर्डे, सुनिल मोरे, साहिल बर्डे, अजय पिंपळे, अजय माळी यांसह शिर्डी आणि राहाता तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र राहण्याचे आवाहन केले. निसर्गरक्षण, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक ऐक्य हीच खरी आदिवासी संस्कृतीची ओळख असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
शेवटी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे पदाधिकारी यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.
००००

