कोपरगाव वार्ताहर - शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील कार्यकारिणी तालुकाप्रमुख (पूर्व) संजय दंडवते आणि तालुकाप्रमुख (पश्चिम) गंगाधर राहाणे यांनी संयुक्तपणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख सुनील शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावतीने ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी यांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण आणि शहर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक आठवड्याला दर गुरुवारी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान साप्ताहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यात वरिष्ठ पदाधिकारी शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. यात कोपरगाव तालुक्यातील गट आणि गणातील रचना जाहीर करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरु केले असल्याची चर्चा आहे.
निवड झालेले पदाधिकारी खालीलप्रमाणे, श्री.बाळासाहेब मापारी (उपतालुकाप्रमुख, पूर्व विभाग); श्री.विवेक कुलकर्णी (उपतालुकाप्रमुख,पश्चिम विभाग); श्री.कैलास गव्हाणे (तालुका सचिव); यासंह गटप्रमुख अनुक्रमे श्री.श्रावण कदम (संवत्सर गट); श्री.मच्छिन्द्र देवकर (ब्राम्हणगाव गट); श्री.अंकुश चांदगुडे (सुरेगाव गट); श्री.शब्बीर शेख (शिंगणापूर गट); श्री.नवनाथ औताडे (पोहेगाव गट) यांच्यासह 10 गणातील गणप्रमुख अनुक्रमे श्री.मछिंद्र वाळुंज (संवत्सर गण); श्री.विठ्ठल निकम (वारी गण); श्री.तुषार वाबळे (ब्राम्हणगाव गण); श्री.भाऊसाहेब दत्तात्रय कापसे (करंजी गण); श्री.देविदास मोरे (सुरेगाव गण); श्री.प्रवीण गंभीरे (धामोरी गण); श्री.सीताराम आनंद तिपायले (शिंगणापूर गण); श्री.भाऊसाहेब यादव होरे (कोळपेवाडी गण); श्री.संजय बाळाजी गुंजाळ (पोहेगाव गण); श्री.अप्पासाहेब काशिनाथ होन (चांदेकसारे गण) आदींची निवड जाहीर केली आहे. यासंह अंगीकृत संघटनेत (युवासेना) श्री.सिद्धार्थ शेळके (उपजिल्हा युवा अधिकारी); श्री.विजय गोर्डे (तालुका युवा अधिकारी); श्री.शेखर कोलते (शहर युवा अधिकारी); (ग्राहक संरक्षण कक्ष) श्री.अशोक कर्णा पवार (उपजिल्हा संघटक); श्री.अभिषेक रमेश शिंदे (तालुका संघटक); श्री.रविंद्र कथले (शहर संघटक); (शेतकरी सेना) श्री.धर्मा जावळे (तालुकाप्रमुख); श्री.रविंद्र देवकर (उपतालुकाप्रमुख); श्री.प्रवीण चौधरी (तालुका संघटक) आदी पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुक्यातील शिवसेना अधिक मजबूत करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सर्वं नवनिर्वाचित कार्यकारिणीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर, जिल्हा समन्व्ययक कलविंदर दडीयाल, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, तालुका समन्व्ययक अशोक कानडे, शहरप्रमुख सनी वाघ, वाहतूक सेनेचे इरफान शेख, प्रवीण शिंदे, गिरीधर पवार, कृष्णा आहिरे, सचिन आसने आदींनी अभिनंदन केले आहे.