शहा ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
इंदापूर : इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आली. यामध्ये इयत्ता १ली तील विद्यार्थ्यांनी ऊर्जा भरलेले ड्रिल व नृत्य सादर केले तर २री, ३री आणि ४थी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी “लेहरा दो” या देशभक्तीपर गीतावर रंगतदार गटनृत्य सादर केले.
यावेळी प्ले ग्रुप च्या लहानग्यांनी राष्ट्रीय प्रतीकांचे प्रदर्शन करून आपल्या वारशाबद्दल जागरूकता दर्शवली.नर्सरीच्या मुलांनी नृत्य व देशभक्तीपर घोषणा देऊन वातावरण भारावून टाकले.
K1 च्या विद्यार्थ्यांनी हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत आणि ड्रिल सादर केले.K2 च्या मुलांनी थोर स्वातंत्र्यवीरांच्या भूमिका साकारून त्यांच्या योगदानाला अभिवादन केले.
या सोहळ्याला संपूर्ण व्यवस्थापन मंडळासह पाहुणे उदय शहा, अरविंद गारटकर, महेश पाटील, समता शहा, रोहन गुंडेकर आणि डॉ. रुशिकेश गार्डे तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्य विश्वस्त मुकुंद शहा आणि मुख्य पाहुणे अरविंद गारटकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायन केले आणि परिसर देशभक्तीच्या भावनेने भारला गेला.
यावेळी आरुषी शिंदे, स्वराली शेंडे, श्रीवर्धन घाडगे आणि अधिरा रणवरे यांनी देशप्रेम व्यक्त करणारी प्रेरणादायी भाषणे दिली. संस्थेचे मुख्य विश्वस्त मुकुंद शहा यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शेवटी सर्वांनी एकत्रितपणे “वंदे मातरम्” चा जयघोष करत कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन विद्या कराडे मॅडम व राजश्री पाटील मॅडम यांनी केले. संपूर्ण सोहळा अंगद शहा सर आणि रुचिरा शहा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला आणि सर्वांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.