निमसाखर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
दहावी व बारावीतील विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
स्व . प्रकाश (भाऊ) सपकळ युवा फाउंडेशनच्या वतीने गेली दहा वर्षापासून सामाजिक उपक्रम.
इंदापूर : निमसाखर येथे स्व . प्रकाश (भाऊ) सपकळ युवा फाउंडेशनच्या वतीने निमसाखर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत मुले व मुलींचे सत्कार करून भेटवस्तू देण्यात आले व प्राथमिक शाळेच्या 160 मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या .
असा सामाजिक उपक्रम गेली दहा वर्षापासून फाउंडेशनच्या वतीने आयोजक भारत प्रकाश सपकळ राबवत आहेत.
या कार्यक्रमास इंदापूरचे कैलास कदम, वीरसिंह रणसिंग ,धनंजय रणवरे, पृथ्वीराज घोलप, गोविंद रणवरे, शिवाजी खिलारे, पोपट कारंडे, गोरख शेळके, शेखर पानसरे, अरविंद अडसूळ, विनायक घोडे, महेश अडसूळ, विशाल भोसले, विनोद भोसले, मनोज सपकळ इकबाल शेख व इतर ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.