shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साने गुरुजी निवासी विद्यालय एक उत्तम ब्रँड.-दत्ता चाटे!!

केज - दि.२,  प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-                                 

साने गुरुजी निवासी प्रा.मा.उच्च माध्यमिक विद्यालय केज व नरेंद्र मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज येथे शिक्षक - विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे बोलत होते या प्रसंगी त्यांनी साने गुरुजी निवासी विद्यालय गुणवत्ता, उपक्रमशीलता, स्पर्धा परीक्षा, विविध स्पर्धा, सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण या सर्वच बाबीनी परिपूर्ण झाले असून केज तालुक्यातील एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवणारे एक नामांकित उत्कृष्ट ब्रन्ड असणारे विद्यालय झाले आहे .या विद्यालयाची विद्यार्थी संख्या १२०० च्या जवळपास आहे.सर्वत्र विद्यार्थ्यांची अडचण असताना या शाळेची संख्या वाढतच चाललेली आहे.गुणवत्ता चांगली असेल तर शैक्षणिक विकास होतो.शाळेची गुणवत्ता चांगली आहे.



       उपक्रमशिल विद्यालय आहे.म्हणुन शाळेचा विकास होत आहे.एक उत्तम ब्रांड असणारे विद्यालय म्हणून केज तालुक्यात साने गुरुजी निवासी विद्यालय नावारूपाला आले आहे. याच वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नवनाथ काशिद म्हणाले की, ज्या प्रमाणे चौकोनी चिरा असतो त्या प्रमाणे या शाळेतून गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी बाहेर पडत आहेत. संस्कार रुजविण्याचे बीज या शाळेत आहेत.विद्यार्थी एवढे उच्च ज्ञानार्थी आहेत कीशिक्षकांनी सुद्धा एवढे उच्च दर्जाचे ज्ञान देण्यासाठी अपडेट होणे आवश्यक आहे. 

तर अध्यक्षपदावरून बोलत असताना संस्थाध्यक्ष श्री उद्धवराव कराड पालकांना म्हणाले ' स्वप्न तुम्ही पहा साकार आम्ही करू, स्वप्न हे मेंदूचे खाद्य आहे. शालेय वयात मुले घडले नाही तर ते घडू शकत नाहीत. ऊसतोड कामगारांचा विकास पैशाने होत नाही तर त्यांची पुढची पिढी शिकल्याने होईल. त्यामुळे पालकांनो मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्या. तुमचा विकास होणारच असे मत त्यांनी व्यक्त केले. शाळेत चालणाऱ्या इको क्लबच्या वतीने शासकीय उपक्रम ' एक पेड मा के नाम ''या उपक्रमांतर्गत पालकांना वृक्ष भेट देऊन वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आव्हान केले .तर वेगवेगळे स्टॉल लावून पालकांना शाळेतील गुणवत्ता, क्रीडा यांची माहिती देण्यात आली. 

तसेच मा. नरेंद्र मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बीपी ,वजन चेक अपचा स्टॉल लावून पालकांचे! चेक अप करून एक वेगळा सामाजिक संदेश दिला. शाळेत कार्यरत असणाऱ्या वस्तीग्रह विभागाबद्दल वस्तीग्रह अधीक्षक श्री चाटे सर ,चोले सर, श्रीमती लहाने यांनी पालकांना माहिती सांगितली तर शाळेत कार्यरत असणाऱ्या विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाबद्दल पालकांना माहिती दिली. तसेच श्री गालफाडे शाम श्री चौरे ,श्रीमती खांडेकर, श्रीमती तांदळे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष श्री कापसे साहेब ,माता पालक श्रीमती मुंडे ताई, पालक प्रतिनिधी रमेश चौरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता गित्ते मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. गायके व कार्तिकी कदम यांनी केले. आभार प्रदर्शन श्री पाटोळे यांनी मांडले तर कार्यक्रमाची सांगता बालविवाह प्रतिबंधक शपतेने झाली ही शपथ श्रीमती शिरसाट मॅडम यांनी सर्वांना दिली. वस्तीग्रह विभागामार्फत पालकांना चहा ,नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शाळेतील बँड पथक व स्वागत गीत या चमुने पालकांचे जंगी स्वागत केले.शिक्षकांनी सुद्धा एवढे उच्च दर्जाचे ज्ञान देण्यासाठी अपडेट होणे आवश्यक आहे. तर अध्यक्षपदावरून बोलत असताना संस्थाध्यक्ष श्री उद्धवराव कराड पालकांना म्हणाले ' स्वप्न तुम्ही पहा साकार आम्ही करू, स्वप्न हे मेंदूचे खाद्य आहे. 

शालेय वयात मुले घडले नाही तर ते घडू शकत नाहीत. ऊसतोड कामगारांचा विकास पैशाने होत नाही तर त्यांची पुढची पिढी शिकल्याने होईल. त्यामुळे पालकांनो मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्या. तुमचा विकास होणारच असे मत त्यांनी व्यक्त केले. शाळेत चालणाऱ्या इको क्लबच्या वतीने शासकीय उपक्रम ' एक पेड मा के नाम ''या उपक्रमांतर्गत पालकांना वृक्ष भेट देऊन वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आव्हान केले .तर वेगवेगळे स्टॉल लावून पालकांना शाळेतील गुणवत्ता, क्रीडा यांची माहिती देण्यात आली. तसेच मा. नरेंद्र मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बीपी ,वजन चेक अपचा स्टॉल लावून पालकांचे! चेक अप करून एक वेगळा सामाजिक संदेश दिला. शाळेत कार्यरत असणाऱ्या वस्तीग्रह विभागाबद्दल वस्तीग्रह अधीक्षक श्री चाटे सर ,चोले सर, श्रीमती लहाने यांनी पालकांना माहिती सांगितली तर शाळेत कार्यरत असणाऱ्या विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाबद्दल पालकांना माहिती दिली. तसेच श्री गालफाडे शाम श्री चौरे ,श्रीमती खांडेकर, श्रीमती तांदळे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष श्री कापसे साहेब ,माता पालक श्रीमती मुंडे ताई, पालक प्रतिनिधी रमेश चौरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता गित्ते मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. गायके व कार्तिकी कदम यांनी केले. आभार प्रदर्शन श्री पाटोळे यांनी मांडले तर कार्यक्रमाची सांगता बालविवाह प्रतिबंधक शपतेने झाली ही शपथ श्रीमती शिरसाट मॅडम यांनी सर्वांना दिली. वस्तीग्रह विभागामार्फत पालकांना चहा ,नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शाळेतील बँड पथक व स्वागत गीत या चमुने पालकांचे  स्वागत केले.

close