एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या अक्षरा बनसुडे हिचा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी सरळ प्रवेश!
इंदापूर : जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता ५ वीतील विद्यार्थिनी अक्षरा बापू बनसुडे (कब क्लास U-11, -22 किलो वजनी गट) हिने आपल्या कौशल्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे ती थेट राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडली गेली आहे.
अक्षरा ही या वर्षी पुणे जिल्ह्यासाठी सुवर्ण पदक मिळवणारी पहिली महिला बॉक्सर ठरली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण शाळा, पळसदेव गाव व जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.तसेच प्रसाद विनोद बनसुडे
35-37kg (U-15)सब ज्युनिअर बॉईज,भक्ती कल्याण बनसुडे
28- kg (U-13) कॅडेट गर्ल्स,
दूर्वा सतीश बनसुडे
30-32kg (U-13) कॅडेट गर्ल्स ,
मधुरा प्रकाश बनसुडे
42-44kg(U-13) कॅडेट गर्ल्स व क्रीडा प्रशिक्षक सतीश मल्हारी बनसुडे यांचा
गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे ,उपाध्यक्ष डॉ. शीतलकुमार शहा
,कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे,सचिव नितीन बनसुडे,प्राचार्य सौ. वंदना नितीन बनसुडे,मुख्याध्यापक राहुल वायसे,उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे,सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व माननीय विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले.