आय चॅम्प अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत एल. जी. बनसुडे स्कूलचा दिमाखदार कामगिरी.
इंदापूर : दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी अकलुज (शंकरनगर) येथील स्मृती भवन येथे आय चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील बक्षीस वितरण सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
यावेळी जयसिंह मोहीते पाटील, हनुमंत लक्ष्मण बनसुडे, स्वरूपाराणी जयसिंह मोहीते पाटील, सयाजीराजे संग्रामसिंह मोहीते पाटील, नितीन दशरथ बनसुडे, विश्वजीत माने, संदीप जाधव, व प्राचार्या सौ. वंदना बनसुडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिमाखात पार पडला.
३६५ विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला, पण विशेष गौरवाचा क्षण म्हणजे एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज, पळसदेव शाळेच्या यशस्वी विद्यार्थि:
सुपर इंटेलिजंट – कु. स्वरा नगरे – ज्यांचे गणित कौशल्य आणि स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी आहे!
प्रथम क्रमांक – कु. हर्षदा कोळेकर , सौरभ तेरवे
द्वितीय क्रमांक – आदेश कण्हेरकर
तृतीय क्रमांक - गायत्री गाढवे ,महेश कळसकर
उत्तेजनार्थ - ओम मारकड
विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षिका सौ. सुवर्णा वाघमोडे मॅडम यांचा "आदर्श शिक्षिका" म्हणून यथोचित गौरव करण्यात आला.