इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ अशोक एकनाथ काळंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्राचार्य पदी नियुक्त झाल्याबद्दल संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते डॉ.काळंगे यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्था विश्वस्त शंकरराव रणसिंग,माजी प्रभारी प्राचार्य डॉ.विजय केसकर,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,प्रा.डॉ.सुहास भैरट.डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.प्रशांत शिंदे ,प्रा.राजेंद्र्कुमार डांगे,प्रा.ज्योत्स्ना गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.काळंगे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा महाविद्यालयाच्या जडण घडणीसाठी नक्कीच उपयोग करू असे आश्वासन दिले.संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी हितासाठी संस्था नेहमी महाविद्यालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे सांगितले.
डॉ.काळंगे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधुन भौतिकशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी संपादन केली आहे.शिक्षण क्षेत्रातील अध्यापन कार्याचा त्यांना ३६ वर्षांचा अनुभव आहे.त्यांच्या ६ संशोधन पेटंटना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. संशोधनात २० संशोधन लेखाचा व ५ पुस्तकाचा तसेच २ संशोधन प्रकल्पाचा समावेश आहे.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ पेपर सादरीकरणाकरिता त्यांनी परदेशातील व्हियेतनाम,थायलंड व उझबेकिस्तान इ.देशाचे दौरे केले आहेत. डॉ. अशोक काळंगे यांची प्राचार्यपदी नियूक्ती झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,विश्वस्त शिवाजीराव रणवरे,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त सौ.विरबाला पाटील,विश्वस्त सौ.राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.तेजश्री हुंबे यांनी केले.