सुरत | प्रतिनिधी:नॅशनल धोबी महासंघाच्या सुरत (गुजरात) जिल्हाध्यक्षपदी हरिओम उर्फ रूपेश वासुदेवराव बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्य, सामाजिक योगदान आणि माध्यमांशी असलेल्या उत्तम संवाद कौशल्याच्या आधारावर ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली.
या निवडीमुळे धोबी समाजात आनंदाचे वातावरण असून श्री. बोरसे यांना विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा मिळत आहेत. समाजहितासाठी त्यांच्या कार्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
या वेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नागमलेश्वर राव वररपू, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष राजू दिवाकर, सचिव रज छोटेलाल परदेशी, प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य अनिल एस. मोरे, तसेच उत्तर महाराष्ट्र संघटक व प्रसिद्धी प्रमुख गुलाबराव जगन्नाथ भदाणे (जळगाव) यांनी श्री. बोरसे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महासंघाच्या नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला आहे की, श्री. बोरसे यांच्या नेतृत्वात संघटनेची कार्यक्षमता अधिक दृढ होईल व समाजहिताची कामे प्रभावीपणे पार पडतील.