एरंडोल – सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम सामाजिक वनीकरण विभाग जळगाव अंतर्गत, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण एरंडोल यांच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा राबवला जात आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि हरितक्रांतीबद्दल जागृती घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिजामाता विद्यालयात वृक्षारोपण...
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एरंडोल येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या हातून लावलेली प्रत्येक रोपे हे हरित भविष्यासाठी पेरलेले स्वप्न असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती...
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अमित दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याचे आणि एकसंघ प्रयत्नांद्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
श्री महेश भगवान पाटील (वनपाल), श्री शिवाजी माळी (वनरक्षक), श्री मधुकर पी. पवार, डी.डी.एस.पी. कॉलेजचे कोऑर्डिनेटर डॉ. श्री अरविंद बडगुजर सर, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण केदार सर, शेखर पाटील सर, गोरख गायकवाड सर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


