shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भटके-विमुक्त दिन: आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली समाज एकत्र, इतिहासाला दिला नवा वेध..

औसा, दि. 31 ऑगस्ट

विजय मंगल कार्यालय, तुळजापूर नाका येथे भटके-विमुक्त समाजाच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने “भटके-विमुक्त दिन” उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम समाजासाठी जागरूकता, आत्मसन्मान आणि हक्कांसाठी लढण्याचा संदेश देणारा ठरला.




या मेळाव्यात विदर्भातील भटक्या समाजातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. साहित्यिक टी. एस. चव्हाण यांनी भटक्या समाजाच्या इतिहासावर भाष्य करताना म्हटले,

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 1871 चा जन्मजात गुन्हेगार कायदा रद्द करण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागली. देशासाठी लढणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याची ही खरी शोकांतिका आहे. या कायद्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाची प्रगती खुंटली, शिक्षण थांबले, गरिबी-अज्ञान आणि अंधश्रद्धा वाढली. आजही समाज याच संघर्षातून वाटचाल करतो आहे.”

त्यांनी शासनाने या समाजासाठी वेगळे आणि प्रभावी धोरण आखण्याची मागणी केली.

📌 आमदार अभिमन्यू पवार यांची भक्कम हमी
आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की ते भटके-विमुक्त समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत आणि समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यांच्या दृढनिश्चयामुळे उपस्थित समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी गोरोबा शिंदे विशेष उपस्थित होते. तसेच प्रा. अशोक तांबे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. भटके-विमुक्त भाजपा शहराध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनीही या सोहळ्यासाठी मोलाचे योगदान दिले.

📍 वडार समाजासह सर्व भटक्या-विमुक्त घटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा या कार्यक्रमाचा ठळक भाग ठरला. समाजातील ऐक्य, संघर्षाची जाणीव आणि आपलेपणाची भावना यामुळे हा कार्यक्रम केवळ एक सोहळा न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमासाठी अनेक भागातून भटके विमुक्त कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या भविष्याला नवा आत्मविश्वास आणि दिशा मिळाल्याचे या दिवशी स्पष्ट झाले.


close