एरंडोल (प्रतिनिधी):एरंडोल शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेले हे शिबिर समाजकार्याची सुंदर परंपरा जपणारे ठरले.
बालाजी मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, दत्त कॉलनी मित्र मंडळ, मधुकर नगर मित्र मंडळ, रेणुका नगर मित्र मंडळ व संकट मोचन मित्र मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे उद्घाटनावेळीच सोनार यांनी स्वतः रक्तदान करून युवकांसमोर आदर्श घालून दिला.
या शिबिरात ४० ते ५० युवक व नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात मोलाचा सहभाग नोंदविला. रक्तदानासंदर्भात जागृती व आयोजनाची जबाबदारी रेड प्लस सोसायटीचे रवींद्र पाटील, अशोक कोळी आणि वैष्णवी ठाकूर यांनी घेतली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मुरली कोळी, समाधान पाटील, विशाल पाटील, मोहित सोनार, दिनकर पाटील, साईनाथ चौधरी, हरीश महाजन, होनाजी बोरसे, अनिल पाटील, सुभाष अहिरे, ज्ञानेश्वर महाजन, करण वाघ, सोहम देशमुख, जीवन पाटील आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
समाजातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत समाजसेवेचा उत्तम आदर्श घालून दिल्याने शहरात सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.