shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेवापूर्ती सत्कार सोहळा : बापूसो. एस. एच. भोसले सरांचा भव्य गौरव.

सेवापूर्ती सत्कार सोहळा : बापूसो. एस. एच. भोसले सरांचा भव्य गौरव.

पिंपळे बु (प्रतिनिधी)
– कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु येथील मुख्याध्यापक बापूसो. श्री. एस. एच. भोसले सर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा अत्यंत भव्यदिव्य वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासो. श्री. डी. के. पवार सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास मंडळ नवलनगरचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब श्री. बी. टी. पाटील, माजी प्रशासकीय अधिकारी जीभाऊसो. श्री. एस. एन. पाटील, भालेराव सर तसेच भोसले सरांचे बंधू श्री. विजय भोसले आणि संपूर्ण परिवार उपस्थित होता.

सोहळ्याची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भोसले सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामविकास मंडळ नवलनगरअंतर्गत कार्यरत सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसले सरांनी आपल्या दीर्घ सेवेतून शिस्तप्रिय कारभार, पारदर्शक प्रशासन आणि कार्यक्षम व्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, प्रामाणिकपणा व गुणवत्तापूर्ण शिक्षण रुजविण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कष्टाळूपणामुळे व दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीमुळे विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच खेळांच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

कार्यक्रमात उपस्थित शिक्षक, सहकारी, माजी विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त करून भोसले सरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा प्रेरणादायी मुख्याध्यापक” अशी ओळख मिळवलेले भोसले सर निवृत्त होत असले तरी त्यांचे कार्य हे पिढ्यान् पिढ्या प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.

सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास मंडळाच्या प्रतिनिधींनी मान्यवरांचे केले.

close