shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागपूर विभागातील सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षकांचे ३० वर्षे लाभाचे रखडलेले प्रकरण अखेर निकाली


*हिवताप मध्यवर्ती संघटनेचे प्रयत्नाला यश*  *काॅ. डी. एस. पवार प्रदेश सरचिटणीस

 नागपूर विभागातील सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षकांना सातव्या वेतन आयोगाचे शिफारशीनुसार तीन लाभाची योजना नुकतीच  मंजूर करण्यात आली आहे. यासाठी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष आर. एन.सोनार व प्रदेश सरचिटणीस डी. एस. पवार यांचे नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षापासून  सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षकासह ईतर पात्र कर्मचार्यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात यावा यासाठी मध्यवर्ती  संघटनेने  सतत प्रयत्न केले आहे. मा. उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर व मा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर यांचेकडे  सतत पाठपुरावा करून वेळोवेळी चर्चा ही  झाल्या. माहे मार्च २०२५ ला नागपूर येथे साखळी उपोषणाची नोटीस संबंधित प्रशासनाला दिली. त्यावर  संघटनेने प्रस्ताविक केलेल्या मागण्यावर प्रशासन सकारात्मक असुन सप्टेंबर २५ पर्यंत निकाली काढण्याचे लेखी पत्र संघटनेला दिले.त्यामुळे विद्यमान आंदोलन संस्थगीत केले.नंतर मागील महिन्यात याबाबतचा आढावा घेतला कार्यवाही अंतीम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली.  प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाने २७ कर्मचार्यांचे तिसरा लाभ मंजुरीचे आदेश अखेर  निर्गर्मित केले. महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. न. २९३४ चे यश आहे. यासाठी नागपूरचे  सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक संघटना  व श्री. दिपक गोतमारे यांनी खूप मेहनत घेतली. 
 प्रशासनाने विलंब का होईना पण योग्य न्याय दिला त्याबद्दल आज  मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांचे नेतृत्वामधे मा. उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर व मा.धुमाळे मॅडम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप)नागपुर यांची त्यांचे दालनात भेट  घेऊन पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. व प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याबद्धल आभार मानले. तसेच नागपूर विभागातील आरोग्य कर्मचारी संवर्गामधुन   आरोग्य निरिक्षक या पदावरील पदोन्नती पदोन्नतीचे प्रकरण सुद्धा त्वरित निकाली काढावे यासाठी चर्चा करून निवेदन दिले. संबंधित कार्यालयाकडुन प्रस्ताव मागितले आहे पुढील  महिन्यापर्यत  पदोन्नती ची प्रकरण निकाली काढण्याचे मॅडमने मान्य केले.
सोबतच जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा हत्तीरोग अधिकारी यांनी वारंवार पाठपुरावा करुन लाभ मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल   जिल्हा हत्तीरोग अधिकारी श्रीमती मोनिका चारमोडे मॅडम  यांचेही  पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

त्यानंतर मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री. डी. एस. पवार यांचा तिसरा लाभ मिळालेल्या कर्मचार्यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.याप्रसंगी  अमरावतीचे कार्याध्यक्ष डॉ. एस. सी. माणिकपुरे नागपूरचे सरचिटणीस श्री.दिपक गोतमारे  व सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गणेश बोकडे,परसराम डोंगरे ,संजय आमटे , विनोद टेंभुर्णी, भगवान चरडे व वर्धा जिल्हाचे चंद्रकांत मुटकुळे गजु थेटे, दिलीप बरबट प्रविण जिंजरकर, विलास उरकुडे व ईतर कर्मचारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते*.
 
close