हिंद सेवा मंडळ अहिल्यानगर संचलित क. जे . सोमैया हायस्कूल मध्ये विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पयवेक्षक कल्याण लकडे, जेष्ठ शिक्षक बाबा वाघ, उर्मिला कसार आदी उपस्थित होते . या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी दिन विषयी कविता, मुहावरे, नाटीका, सादर केली . सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट वस्तु देऊन प्रोत्साहित करण्यात आले . हिंदी विषयाच्या अध्यापिका शरयू यरगट्टीकर यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषा सरल, सुलभ, सुगम आहे, सन १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला . त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणुन साजरा केला जातो असे सांगीतले .
विद्यालयाचे मुख्याध्यपक, पयवेक्षक यांनी हिंदी दिनाचे महत्व सांगुन हिंदी दिना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंजिरी काटकर, ज्योती फुलवर, स्मिता पुजारी, संतोष सोले, प्रयत्नशील होते .