शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार ता. ०२/१०/२०२५
राहुरी : नवरात्र उत्सवानिमित्त राहुरीतील आझाद मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात साताऱ्याचे प्रसिद्ध शिवशंभू चरित्रकार आणि प्रख्यात कीर्तनकार अनिल महाराज देवळेकर यांनी लव्ह जिहाद आणि गोहत्या या ज्वलंत विषयांवर परखड आणि जागृतीपर भाषण केले.
महाराजांनी आपल्या भाषणात हिंदू समाजातील तरुणांनी निर्भय होऊन समाजासाठी झगडण्याचे आवाहन केले. “मनात भीती ठेवणारा माणूस त्याग करू शकत नाही. ९५ वर्षांचे भिडे गुरुजी आजही २५० सूर्यनमस्कार घालतात, तो आदर्श आपल्याला घ्यावा लागेल,” असे ते म्हणाले. महिलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “आपल्या धर्मात मुलींना देवीचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.”
मुलांना प्रेमाने वागवा, पण देव, देश आणि धर्म यांच्याविरोधात उभ्या राहणाऱ्यांविरोधात ठाम भूमिका घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी महाराजांच्या मुद्देसूद आणि स्पष्ट मांडणीचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी ट्रस्टला सदिच्छा भेट दिली. अध्यक्ष अमृत दहिवाळकर आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल हिंदू समाज, राहुरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आझाद मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अमृत दहिवाळकर, उपाध्यक्ष गणेश ढोले, गोविंद दहिवाळकर, बंडू दहिवाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
सुरक्षा व्यवस्था देखील भक्कम ठेवण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

