प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-
सावरगाव घाट तालुका पाटोदा येथील भाजपच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान भक्ती गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता धस यांनी केले आहे.
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या सुपुत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि माजी खा. डॉ. प्रतिमाताई मुंडे यांनी कायम ठेवली आहे. संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर दरवर्षी हा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यंदाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
यंदा २ ऑक्टोबर रोजी होणारा दसरा मेळावा हा माजी मंत्री आ. पंकजा मुंडे आणि माजी खा. डॉ. प्रतिमाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक होणार आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे तळमळीचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता धस यांनी केले आहे.


